Tarun Bharat

देशात निम्याहून अधिक रूग्णांची कोरोनावर मात

रूग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या प्रथमच वाढली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेली तीन महिने संपूर्ण देशवासीयांना वेठीस धरणाऱया कोराना विषाणूपेक्षा भारतीय वरचढ ठरल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. एकुण रूग्णसंख्येपेक्षा कोरानामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या देशात प्रथमच वाढली. आजपर्यंत देशात 2 लाख 77 हजार 104जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. यातील 1 लाख 35 हजार 205 रूग्ण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर बरे होण्याची टक्केवारी तब्बल 48.88 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत 1 लाख 33 हजार 632 जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या 7 हजार 751 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, मागील 24 तासात 9 हजार 985 नवे रूग्ण आढळले. तर 279 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये रूग्ण बरे होण्याचा टक्का आणखी वाढला

देशात रूग्ण बरे होण्याचा सर्वाधिक टक्केवारी ही उत्तर प्रदेशमध्ये आहे. मात्र राज्यात रूग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर बिहारमधीलही वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय ठरला आहे. बिहारमधील सर्वाधिक रूग्ण हे परराज्यातील मजुर आहेत.

          द्रमुक आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू

चेन्नईमधील द्रमुकचे आमदार जे. अन्बाझगन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 62 वर्षांचे होते. त्यांना ाधुमेहाचा त्रास होता. मागील आठवडय़ात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर चेन्नईतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू हेणार ते देशातील पहिले आमदार ठरले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये 11 लाख मजूर परतले

पश्चिम बंगालमध्ये परराज्यात काम करणारे 11 लाखांहून अधिक मजूर परतले आहेत. 30 हजार अद्याप येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिली. परराज्यातून येणाऱया रेल्वेला मी कधीच कोरोना एक्प्रेस म्हटले नाही. लोकांनीच हे नाव दिले, असेही त्या म्हणाल्या.

आखातामध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी 58 विमानांची सोय

आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीसाठी 30 जूनपासून 58 विमानाची सोयकरण्यात आली आहेत. वंदे भारत मिशन अंतर्गत उड्डाण करण्यात येणारी 107 विमानाची संख्या 165 करण्यात आली आहे, अशी माहिती नागरी उड्डायण मंत्र्यांनी दिली.

दिल्लीतील जामा मशीद पुन्हा बंद होऊ शकते: शाही इमाम

दिल्लीमध्ये कोराना विषाणू संसर्गाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे दिल्लीतील जाम मशीद पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी बुधवारी दिला. शाही इमाम यांचे सचिव अमानुल्ला यांचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभुमीवर बोलताना त्यांनी दिल्लीतील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येवरही चिंता व्यक्त केली. तसेच नागरिकांनी सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहनही केले.

Related Stories

2000 रूपयांच्या नोटांची छपाई थांबविली

Patil_p

उत्तराखंडमध्ये 3 दिवसांसाठी रेड अलर्ट

Patil_p

‘जादूची कांडी’ नाही, ‘निःस्वार्थी कार्य’च पक्षाला पुनरुज्जीवित करेल !

Patil_p

कोविड काळात वाढत्या बेरोजगारीने देशातील चोऱ्यांमध्ये वाढ

datta jadhav

विकलेल्या महिलेची समाजसेवा

Patil_p

सीमेवरील प्रत्येक दुःसाहसाला यशस्वी प्रत्युत्तर

Patil_p