Tarun Bharat

देशात पहिल्यांदाच धावली ग्रीन हायड्रोजन कार, गडकरींचा संसदेपर्यंत प्रवास

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात पहिल्यांदाच ग्रीन हायड्रोजन इंधनावरील कार धावली. पर्यायी इंधनाचा पुरस्कार करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज ग्रीन हायड्रोजनवरील ‘टोयोटा मिराई’ कारमधून संसदेत दाखल झाले. भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आम्ही पाण्यापासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजन सादर केला आहे. ही कार एक पायलट प्रोजेक्ट आहे. लवकरच देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

गडकरी म्हणाले, जगभरात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे स्वच्छ इंधनाची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर करण्याचं ठरवलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला ग्रीन हायड्रोजन सर्वात मोठा पर्याय आहे. त्याचा खर्च प्रति किलोमीटर 2 रुपये येईल. केंद्र सरकारने 3000 कोटी रुपयांचे मिशन सुरू केले असून, देश हायड्रोजन निर्यात करणारा देश बनेल. जिथं कोळशाचा वापर होतो तिथं ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर होईल.

‘मिराई’ ही कार जपानच्या टोयोटा कंपनीची असून, ग्रीन हायड्रोजन इंधन फरिदाबादस्थित इंडियन ऑईल पंपाचे आहे. ही कार इंधन भरल्यानंतर जवळपास 600 किलोमीटर अंतर पार करू शकते, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

Related Stories

नियम धाब्यावर बसवून पार्ट्या करणाऱ्यांवर होणार कारवाई

Archana Banage

सोलापूर शहरात 64 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, चौघांचा मृत्यू

Archana Banage

तेलंगणा : बलात्कार करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला रेल्वे रुळावर

Archana Banage

नेटफ्लिक्स-युनेस्को यांची हातमिळवणी

Patil_p

शरद पवारांचं आयुष्य आग लावण्यातच गेलं

datta jadhav

ओवैसींनी सुरक्षा स्विकारावी!

Patil_p
error: Content is protected !!