Tarun Bharat

देशात प्रचंड वेगाने कोरोनाचे संक्रमण

Advertisements

24 तासात 1,68,912 पॉझिटिव्ह रुग्ण, आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

प्रचंड वेगाने होत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे देशात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशातील रुग्णवाढ मोठय़ा संख्येने झाली आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनची ही उच्चांकी रुग्णवाढ असून, कोरोनामुळे मृत्यू होणाऱया रुग्णांची संख्याही वाढली आहे. 24 तासांत 1 लाख 68 हजार 912 कोरोनाबाधित आढळून आले असून, याच कालावधीत देशात 904 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 75 हजार 86 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे. रविवारी नोंदवण्यात आलेली रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. देशातील एकूण मृतांची संख्याही 1 लाख 70 हजार 179 इतकी झाली असून, एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 35 लाख 27 हजार 717 वर पोहोचली आहे. तसेच सक्रिय रुग्ण 12 लाखांहून अधिक झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दिवसभरात 75 हजार 86 ने वाढल्यामुळे ती आता 1 कोटी 21 लाख 56 हजार 529 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 89.86 टक्के इतका झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली असून रविवारी दिवसभरात 63 हजार 294 कोरोना रुग्ण आढळले होते. तसेच उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि छत्तिसगड या राज्यांमध्येही नवे रुग्ण झपाटय़ाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 3 ऑगस्टला सुनावणी

Patil_p

छत्तीसगडमध्ये मदतनिधीची घोषणा

Patil_p

डिसेंबर 2021 पर्यंत लसीकरण पूर्ण करणार!

Patil_p

भारतासोबत आता वैर पत्करणार नाही!

Patil_p

देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं अमित शहा यांच्या भेटीमागचं कारण

Abhijeet Shinde

पंजाबमध्ये नौदलाचे मिग-29 विमान कोसळले; दोन्ही पायलट सुखरूप

datta jadhav
error: Content is protected !!