Tarun Bharat

देशात बलात्काराचं सत्र सुरूच, महिला कॉन्स्टेबलवर तिघांनी बलात्कार करत रेकॉर्ड केला व्हिडिओ

Advertisements

भोपाळ/ प्रतिनिधी

राज्यात आणि देशभरात गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या अनेक घटना घडत आहेत. अलीकडेच महाराष्ट्रातील साकीनाका (sakinaka rape case), डोंबिवली (dombivli gang rape) तर कर्नाटकातील म्हैसूर बलात्कार ( mysore rape case) प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला असताना आता आणखी एक बलात्काराची घटना मध्य प्रदेशच्या (madhya pradesh) नीमच (neemuch rape case) जिल्ह्यातून समोर आली आहे. याठिकाणी एका महिला कॉन्स्टेबलवर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे, तर इतर तिघे फरार आहेत, असे महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनुराधा गिरवाल यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर आरोपी पवनने या वर्षाच्या सुरुवातीला महिला कॉन्स्टेबलशी मैत्री केली. त्यानंतर ते प्रत्यक्षात भेटू लागले. आरोपी पवन हा नीमचमधील मनसा शहरातील रहिवासी असून पीडितेला भेटायला इंदूरला गेला होता. नंतर पवनने पीडितेला त्याचा भाऊ धीरेंद्रच्या वाढदिवसासाठी मनसा येथे आमंत्रित केले. पवनच्या घरी, त्याचा भाऊ धीरेंद्र आणि विजय यांनी महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केला. या कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने पवन घरी आल्यावर त्याला घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्यानेही तिच्यावर बलात्कार केला, असं पीडितेनं जबाबात म्हटलंय.

Related Stories

‘अर्जुन’ क्षणार्धात उडवणार शत्रूच्या चिंधडय़ा

Omkar B

देशात सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत घट, तर कोरोनाबळींत वाढ

Archana Banage

फोन टॅपिंग प्रकरण रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांकडून समन्स

Archana Banage

बाबरी विध्वंस प्रकरणी अपील याचिका फेटाळली

Patil_p

संभाजीनगरात एसटी बस खाली सापडून पादचारी ठार

Archana Banage

farmers protest : ‘जशास तसं उत्तर द्या. उचला लाठ्या’

Archana Banage
error: Content is protected !!