Tarun Bharat

देशात बेरोजगारी दरात घट

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कोरोनामुळे भारतासह जगभरात बेरोजगारीच्या संकटात वाढ झाली आहे. लॉकडाऊन केल्यानंतर अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. आता हळू हळू सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे लादण्यात आलेले निर्बंधही हटवले जात आहेत. आता भारतातील बेरोजगारीबाबतची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये देशात बेरोजगारी दरात घट झाली आहे.

२०२२ मध्ये बेरोजगारी कमी होऊन ६.५७ टक्क्यावर आली आहे. मार्च २०२१ नंतर ही सर्वात कमी आहे. सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, शहरी भागात बेरोजगारी दर ८.१६ टक्के इतका झाला आहे. तर ग्रामीण भागात ५.८४ टक्के इतका आहे. डिसेंबर २०२१ मध्ये एकूण बेरोजगारी दर हा ७.९१ टक्के नोंदवला होता. यात शहरी क्षेत्रात ९.३० टक्के तर ग्रामीण भागात ७.२८ टक्के बेरोजगारी नोंद करण्यात आली होती

Related Stories

आंतरजिल्हा प्रवासासाठी पासची आवश्यकता नाही

Patil_p

नामुष्की टाळण्यासाठी गावस्करांचा मोठा निर्णय, 33 वर्षांनी…

datta jadhav

दिल्ली-जयपूर महामार्गावर बसला आग; तिघांचा मृत्यू

datta jadhav

शबरीमला प्रकरणामुळे माकपला फटका

Patil_p

सर्व प्रलंबित खटले 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकला : मुंबई उच्च न्यायालय

prashant_c

मिरज मेडीकल’च्या सात विद्यार्थिनींना कोरोना

Sumit Tambekar
error: Content is protected !!