Tarun Bharat

देशात मागील चोवीस तासात 6 हजार 654 नवे कोरोना रुग्ण, 137 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील चोवीस तासात देशात 6 हजार 654 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 25 हजार 101 वर पोहचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 1 लाख 25 हजार 101 रुग्णांपैकी 69 हजार 597 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 51 हजार 781 रुग्णांची तब्येत सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आता पर्यंत 3 हजार 720 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाचे 80 टक्के रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण हे पाच राज्यात सर्वाधिक आहे. यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मध्यप्रदेशचा समावेश आहे. त्यातही 60 टक्के रुग्ण हे फक्त मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे आणि चेन्नई शहरातील आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

Related Stories

इस्रो हेरगिरी होते आंतरराष्ट्रीय कारस्थान

Patil_p

…तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

datta jadhav

दिल्ली-एनसीआर प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

Patil_p

नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शरद पवारच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार -संजय राऊत

Archana Banage

बंगल्यावरील हातोडा टाळण्यासाठी राणेंची हायकोर्टात धाव

datta jadhav

लस येईपर्यंत निष्काळजीपणा नको!

Patil_p