ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 2 हजार 293 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 37 हजार 336 पोहचली आहे. तर मागील चोवीस तासांत 73 लोकांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 1218 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 380 रुग्ण बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत 9 हजार 951 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
राजस्थानमध्ये 54 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या 2 हजार 720 वर पोहोचली आहे.
ओडिशा मध्ये मागील चोवीस तासात दोन नवे रुग्ण आढळले असून तेथील एकूण संख्या 156 वर पोहचली आहे. त्यातील 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 50 जणांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकूण रुग्णांपैकी एकचा मृत्यू झाला आहे, असे ओडिशातील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.