Tarun Bharat

देशात मान्सूनचे 100 डेज्

6 जूनलाच झाले होते केरळमध्ये आगमन, देशात आतापर्यंत 93 टक्के पाऊस  

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

 मान्सूनचे केरळमध्ये 6 जूनला आगमन झाले होते. शुक्रवारी त्यास 100 दिवस पूर्ण झाले. देशात आतापर्यंत 93 टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनला निरोप देण्यापूर्वी त्यात सुधारण्याची अजूनही अपेक्षा वाटते. कारण मान्सूनदरम्यान दमदार पावसाच्या कारकांपैकी एक कमी दाबाचा पट्टा सात दिवसांत दोन वेळा बंगाल खाडीत तयार होणार आहे. त्यामुळे मुसळधार पावसासोबतच मान्सून पूर्वेकडून पश्चिमेकडे पोहोचेल. गत आठवडÎात बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टÎामुळे मध्य भारतातून मार्गक्रमण करताना ओडिशापासून गुजरातपर्यंत दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे 23 ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसात 9 ते 10 टक्के घट झाली होती. त्यापैकी आताच्या पावसाने 2-3 टक्के भरपाई होऊ शकेल.

12 ते 20 दरम्यान आणखी पाऊस

बंगालच्या खाडीत ओडिशा किनाऱयावर 11 सप्टेंबर व 16 सप्टेंबरला दुसरा व तिसरे कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. म्हणूनच 12 ते 20 सप्टेंबरदरम्यान मध्य भारत, उत्तर व दक्षिण भारतीय भागांत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होईल. स्कायमेटचे हवामान तज्ञ महेश पालावत म्हणाले, सप्टेंबरमध्ये यंदा सरासरीहून किमान 15 टक्के जास्त पावसाची चिन्हे आहेत. 2019 मध्ये सप्टेंबर महिन्यात विक्रमी 52 टक्क्यांहून जास्त पाऊस झाला होता. 2007 मध्ये 115 टक्के पाऊस झाला होता. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच चांगल्या पावसाची नोंद होत आहे.

65 टक्के जिह्यांत सरासरी किंवा जास्त पाऊस

हवामानतज्ञ म्हणाले, मान्सूनच्या शतकी खेळीत देशातील 65 टक्के जिह्यांत सरासरीहून जास्त पाऊस झाला. 9 सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा 771 मिमी पाऊस अपेक्षित आहे. आतापर्यंत 714 मिमी पाऊस झाला. सरासरीहून त्यात 7 टक्के घट झाली. यंदा मान्सूनला निरोप दिल्यानंतर अधूनमधून हजेरी सुरूच राहील, असा हवामानतज्ञांचा अंदाज आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो.

मान्सूनच्या परतीचीही तारीख लांबली

2019 पर्यंत मान्सूनच्या परतीची सुरुवात होण्याची तारीख एक सप्टेंबर असे. 1961 ते 2019 पर्यंतच्या पॅटर्नच्या आधारे हवामान विभागाने दोन आठवडे पुढे ढकलले आहे. 2020 पासून मान्सूनच्या परतीची सुरुवात पश्चिम राजस्थानमधून सामान्यपणे 17 सप्टेंबरपासून मानली जात आहे. दक्षिणेकडील भाग वगळता उर्वरित देशात मान्सूनची पूर्णपणे पाठवणीची तारीख 15 ऑक्टोबर आहे.

जूनमध्ये 110 टक्के पावसासह चांगली सुरुवात

जूनमध्ये 110 टक्के पावसासह मान्सूनची चांगली सुरुवात झाली होती. परंतु जुलैमध्ये पावसात 7 टक्के घट (93 टक्के) व ऑगस्टमध्ये 24 टक्के (76 टक्के) घट झाली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडÎापासून देशातील विविध भागांत चांगल्या पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्ये सरासरी 170 मिमी पाऊस होतो. परंतु 9 दिवसांत 80 मिमी पाऊस झाला. हे प्रमाण सरासरीहून 15 टक्के जास्त आहे.

सध्यातरी माघारीची शक्यता धूसर

हवामान विभागातील संशोधक आर. के. जेनामनी म्हणाले, बंगालच्या उपसागरात 11 सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र विकसित होणार आहे. राजस्थानमधून मान्सून 17 सप्टेंबरला परतीची सुरुवात करणे शक्य दिसत नाही. 2015 मध्ये 4 सप्टेंबर, 2013 मध्ये 9 सप्टेंबर, 2016 मध्ये 15 सप्टेंबरला मान्सूनच्या माघारीला सुरुवात झाली होती. इतर वर्षांत मान्सूनने 27 सप्टेंबरनंतर निरोप घेतला होता.

Related Stories

पोटनिवडणुकांसाठी सहा राज्यात मतदान

Amit Kulkarni

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 1 कोटींचा आकडा

datta jadhav

एकतर्फी प्रेमातून युवकाने भर दिवसा तरुणीला भोकसले

Archana Banage

77 वर्षीय आजींनी सुरू केला फूड स्टार्टअप

Patil_p

म्हैसींच्या कळपाला ‘वंदे भारत’ची धडक

Amit Kulkarni

मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Archana Banage