Tarun Bharat

देशात रुग्णसंख्या 38 लाखांसमीप

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 78 हजार 357 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 37 लाखांवर पोहोचली आहे. आता देशात कोरोना रुग्णांची संख्या 37 लाख 69 हजार 523 वर पोहोचली असून आतापर्यंत 66 हजार 333 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 हजार 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 8 लाख 1 हजार 282 रुग्णांवर उपचार सुरू असून 29 लाख 1 हजार 908 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारपर्यंत अखेरच्या चोवीस तासात देशात 1 हजार 45 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे एकूण बळींचा आकडा 66 हजार 333 वर पोहोचला आहे.

Related Stories

आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून पूर्वपदावर

Patil_p

अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये मेजरची आत्महत्या

datta jadhav

मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाची चाचणी निगेटिव्ह

datta jadhav

निवडणूक रोखे पद्धती पूर्णतः पारदर्शी !

Patil_p

बाबरी मशीद पुन्हा उभारण्याच्या मागणीसाठी JNU मध्ये आंदोलन

Archana Banage
error: Content is protected !!