Tarun Bharat

देशात लवकरच मिश्र लसीकरण?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लवकरच लसीचे मिश्र डोस दिले जातील. तज्ज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींच्या आधारे औषध नियंत्रक जनरलने (डीसीजीआय) याला मान्यता दिली आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

नुकत्याच झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींच्या मिश्र डोससाठी परवानगी मागितली होती. समितीने त्याला मान्यता दिली आहे. मात्र, यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सल्ला समितीचा निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. लसीकरण समितीच्या शिफारशींच्या आधारे लसीकरणात मिश्र डोसचा समावेश केला जाईल.

दरम्यान, कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचे मिक्स डोस अधिक परिणामकारक आहेत. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली होते. तसेच, मिक्स डोस घेतल्याने वेगळे प्रतिकूल परिणाम दिसून येत नसल्याचा निष्कर्ष आयसीएमआरच्या संशोधनात यापूर्वीच समोर आला आहे.

Related Stories

जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर

Rohit Salunke

दिल्लीत समूह संसर्ग सुरू

Patil_p

Umar Khalid : उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

Abhijeet Khandekar

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ; सुर्यकुमार, क्रुणाल व कृष्णाला संधी

Archana Banage

शेतकरी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

Patil_p

मंदिरात अर्पण करतात घडय़ाळ

Patil_p