Tarun Bharat

”देशात लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब”

Advertisements

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. यावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब असल्याचा टोला त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लगावला आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “देशात कोरोनाची लस, ऑक्सिजन आणि औशधांसोबत पंतप्रधानही गायब झाले आहेत. उरलंय ते फक्त सेंट्रस विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि सगळीकडे पंतप्रधानांचे फोटो.”

राहुल गांधी यांनी यापूर्वी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन सातत्याने केंद्र सरकारवर टीका म्हटलं होतं की, “देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नसल्याचे म्हटले होते.

Related Stories

भारताचे तुकडे करू पाहणाऱयांसोबत दीपिका : स्मृती इराणी

prashant_c

घरोघरी धान्य पोहोचविणार जगनमोहन रेड्डी सरकार

Amit Kulkarni

चीनने स्वतःच्या सैन्याला नियंत्रणात ठेवावे

Patil_p

गुड न्यूज : देशातील 4 राज्ये कोरोनामुक्त!

prashant_c

तरुण भारतच्या बातमीचा इम्पॅक्ट: मृत गव्याला वनविभागाने नदीपात्रातुन काढले बाहेर

Abhijeet Khandekar

कोरोना : महाराष्ट्रात एका दिवसात 58,805 रूग्णांना डिस्चार्ज! पण 816 बळी

Rohan_P
error: Content is protected !!