Tarun Bharat

देशात सक्रिय रुग्णसंख्येत घट

नवी दिल्ली/प्रतिनिधी

देशात गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. सोमवारी देशात २५ हजार ४०४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३३९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. गेल्या २४ तासात देशात ३७ हजार १२७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

देशात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ३२ लाख ८९ हजार ५७९ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २४ लाख ८४ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ४३ हजार २१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात सध्या ३ लाख ६२ हजार २०७ रुग्ण उपचारा आहते. तसेच आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ७५ कोटी २२ लाख ३८ हजार ३२४ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Related Stories

राधानगरी अभयारण्यात ब्लॅक पँथरही? अर्धवट काळा बिबटय़ा कॅमेऱयात कैद

Archana Banage

नागरिकत्व सुधारणा कायद्याचे भाजपचे आश्वासन

Patil_p

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन पोलीस कर्मचारी शहीद

Tousif Mujawar

विसापूर येथे मोटर सायकलवरून पडून एकाचा मृत्यु

Abhijeet Khandekar

बिहारमध्ये ‘महागठबंधन’ समन्वय समिती स्थापणार

Patil_p

जखमींना रुग्णालयात पोहोचवा अन् बक्षीस मिळवा

Patil_p