Tarun Bharat

देशात सलग चौथ्या दिवशी 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात सलग चौथ्या दिवशी 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. शनिवारी 4 लाख 03 हजार 738 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 4091 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. मागील 24 तासात 3 लाख 86 हजार 444 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

देशात आतापर्यंत 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 37 लाख 36 हजार 648 रुग्ण उपचार घेत असून, 2 लाख 42 हजार 362 रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

देशात आतापर्यंत 30 कोटी 22 लाख 75 हजार 471 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 18 लाख 65 हजार 428 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.08) करण्यात आल्या. 

Related Stories

तलाक-ए-हसन संबंधी नोटीस

Patil_p

हिंदू वारसा कायदा : केंद्राला अंतिम कालावधी

Patil_p

‘सीमेवरील परिस्थिती सामान्य नाही’ : परराष्ट्र मंत्री

Sumit Tambekar

बिर्याणी नव्हे गोळय़ा खात आहेत दहशतवादी!

Patil_p

गोग्रा क्षेत्रात सैन्यमाघार पूर्ण

Patil_p

देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!