Tarun Bharat

देशात 1.41 लाख बाधित रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 1 कोटी 08 लाख 58 हजार 371 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 05 लाख 61 हजार 608 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजूनही 1 लाख 41 हजार 511 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 66 लाख 11 हजार 561 जणांना लस देण्यात आली आहे.

देशात मागील 24 तासात 11 हजार 067 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 13 हजार 087 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 94 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 55 हजार 252 एवढी आहे.

देशात आतापर्यंत 20 कोटी 33 लाख 24 हजार 655 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 36 हजार 903 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.09) करण्यात आल्या. 

Related Stories

सुप्रिया लाइफ सायन्सचा येणार आयपीओ

Patil_p

संकटात असलेल्या टेलिकॉम कंपन्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा दिलासा

Archana Banage

भारतीय जीवनपद्धतीचे जगाला आकर्षण

Patil_p

अमेरिकेच्या सीमेवर ४ भारतीयांचा मृत्यू

Archana Banage

शेतकऱयांचे मन वळवण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न

Patil_p

एप्रिल-फेब्रुवारीत सोने आयातीत घट

tarunbharat