Tarun Bharat

देशात 12 तासात 240 नवे कोरोना रुग्ण

Advertisements

कोरोनाग्रस्तांची संख्या 1637 वर , 38 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई :

मागील 12 तासात देशात 240 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1637 वर पोहचली आहे. देशात कोरोनाने आतापर्यंत 38 बळी घेतले आहेत. तर 133 जण या आजारातून बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. 

   देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.  त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, उद्योग, कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत.
 

महाराष्ट्रातही बुधवारी 19 नव्या रुग्णांची भर पडली असून, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 321 वर पोहचली झाली आहे. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीच्या काळात घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

सर्व प्रलंबित खटले 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकला : मुंबई उच्च न्यायालय

prashant_c

कोरोना संसर्गाच्या लक्षणांचा मांडला क्रम

Patil_p

लोकसभा सदस्यत्वाचा सुप्रियोंकडून राजीनामा

Patil_p

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होणार

Nilkanth Sonar

देशात पाच दिवसात 2 लाख बाधित रुग्ण

datta jadhav

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 420 डॉक्टरांचा मृत्यू; IMA ने दिली माहिती

Rohan_P
error: Content is protected !!