Tarun Bharat

देशात 13,788 नवे बाधित, 145 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 13 हजार 788 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 145 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 05 लाख 71 हजार 773 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 52 हजार 419 एवढी आहे.

रविवारी 14,457 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 02 लाख 11 हजार 342 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 08 हजार 012 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

देशात आतापर्यंत 18 कोटी 70 लाख 93 हजार 036 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 05 लाख 48 हजार 168 कोरोना चाचण्या रविवारी (दि.17) करण्यात आल्या. 

Related Stories

‘ऍपल’चा चीनला झटका, भारताचा लाभ

Patil_p

राज्यांच्या तिजोरीत 20 हजार कोटी

Patil_p

पंकजा मुंडेसाठी देवेंन्द्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केले- चंद्रकांत पाटील

Archana Banage

फारुख अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी

Patil_p

भारतीय दूतावासांची इम्रान खान यांच्याकडून प्रशंसा

Amit Kulkarni

भारतनेटसाठी 19,041 कोटी मंजूर

datta jadhav