Tarun Bharat

देशात 24 तासात 1990 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 1990 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 हजार 496 वर पोहचली आहे. आतापर्यंत देशात 24 तासात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
 

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासात 1990 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 49 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 26 हजार 496 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 5 हजार 804 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.देशातील केवळ 27 जिल्ह्यात कोरोनाचे 68.2 टक्के रुग्ण आहेत.महाराष्ट्रात मागील 24 तासात 811 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Related Stories

अनिल देशमुख सीबीआय चौकशीसाठी दाखल

Archana Banage

पंजाबमध्ये पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

Patil_p

मिरजेत एसटी चालकाचा डीझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Abhijeet Khandekar

लस घेतलेल्या खासदारांना चाचणीपासून सूट

Patil_p

पेट्रोल-डिझेल दरात वाढीचे सत्र थांबेना

Patil_p

शेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 5 ठार

datta jadhav