Tarun Bharat

देशात 24 तासात 27,553 बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोना रुग्णसंख्येचा खाली आलेला आलेख मागील काही दिवसांपासून पुन्हा वर जाऊ लागला आहे. मागील 24 तासात देशात 27 हजार 553 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोना रुग्णसंख्येचा वेगाने वाढणारा हा आकडा धडकी भरवणारा असून, प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारी दिवसभरात 284 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 9249 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

ओमिक्रॉन व्हेरिएंटचे भारतात आतापर्यंत 1525 रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक 460 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल दिल्लीत 351, गुजरात 136, तामिळनाडू 117 आणि केरळमध्ये 109 रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 84 हजार 561 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4 लाख 81 हजार 770 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1 लाख 22 हजार 801 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, आज महाराष्ट्रात 9 हजार 170 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये 6 ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा समावेश आहे. ओमिक्रॉन बाधितांमध्ये पुणे ग्रामीणमध्ये 3, पिंपरी-चिंचवडमध्ये 2 तर पुणे महापालिका हद्दीत एक रूग्ण आढळून आला आहे.

Related Stories

शिवसेनेकडून नाशिकमधील भाजप कार्यालयाची तोडफोड

Archana Banage

पुढील ५ दिवस ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट

Archana Banage

गुजरात एटीएसची मोठी कारवाई, मुंद्रा बंदरातून ३५० कोटीचे ड्रग्ज जप्त

Archana Banage

एचआयव्ही विरोधी लसीचे मानवी परीक्षण लवकरच

Patil_p

तारीख पे तारीख ! आता फुटबॉल हंगाम या तारखेला होणार सुरु

Rahul Gadkar

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होणार निवडणूक

Amit Kulkarni