Tarun Bharat

देशात 24 तासात 3970 नवे कोरोना रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 3970 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 85 हजार 940 वर पोहचली असून, मृतांचा संख्या 2752 एवढी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

सध्या देशात 53 हजार 035 ॲक्टिव कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 30 हजार 152 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 35.08 टक्के आहे.

महाराष्ट्रात 1606 नवे रुग्ण

महाराष्ट्रात मागील 24 तासात 1606 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 67 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 524 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 706 वर पोहचली असून, 7088 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Related Stories

इटालिया, गढवी, अल्पेश होणार विजयी

Patil_p

बावीस किलो चांदीची वीट ठेवून रचणार राममंदिराचा पाया

datta jadhav

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 525 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

घरोघरी जाऊन लसीकरण नाहीच; सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश

Archana Banage

काँग्रेसकडून ज्येष्ठांची धोरणात्मक समित्यांवर वर्णी

Patil_p

मिझोराम पोलिसांनी थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांवर दाखल केला गुन्हा

Archana Banage
error: Content is protected !!