Tarun Bharat

देशात 25 हजार नवे बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 25 हजार 320 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 161 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 13 लाख 59 हजार 048 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 58 हजार 607 एवढी आहे. 

शनिवारी 16,637 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 09 लाख 89 हजार 897 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 10 हजार 544 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

देशात आतापर्यंत 22 कोटी 67 लाख 03 हजार 641 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 64 हजार 368 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.13) करण्यात आल्या.

Related Stories

शेतकरी आंदोलक दोन दिवसात माघारी

Patil_p

आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील: चंद्रकांत पाटील

Archana Banage

मेरठमध्ये गंभीर परिस्थिती : म्युकरमायकोसिसचे 24 नवे रुग्ण तर एकाच मृत्यू

Tousif Mujawar

जम्मू : कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द

Tousif Mujawar

निश्चलनीकरणामुळे करसंकलनात मोठी वाढ

Patil_p

11 दिवसांनी बाधिताकडून धोका नाही!

Patil_p