Tarun Bharat

देशात 26 टक्के लोकांचे नव्या घरात स्थलांतर

नाइट प्रँकच्या सर्व्हेक्षणात माहिती सादर

वृत्तसंस्था /मुंबई

कोरोनाच्या प्रभावामुळे अनेकांनी नव्या घरात स्थलांतर करण्याला प्राधान्य दिलेलं आहे. जवळपास नवीन घरांमध्ये 26 टक्के लोकांनी कोरोना संकटात स्थलांतर केले असल्याची बाब समोर आली आहे तर 32 टक्के जण आगामी एक वर्षात नवीन घर खरेदी करण्याची योजना आखत आहेत. सदरची माहिती प्रॉपर्टी कन्सल्टंट फर्म नाइट प्रँकच्या सर्व्हेक्षणात समोर आली आहे.

यामधील जवळपास 61 टक्के लोकांनी येत्या वर्षभरात घरांच्या किमतीत वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतामध्ये कोरोना आणि त्यासोबत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घर खरेदीदारांवर प्रभाव पडला असल्याचे नाइट प्रँक यांनी म्हटले आहे.

अनेक कारणांमुळे बदलले घर

सर्वेक्षणात 26 टक्के मुख्यप्रवाहातील भारतीयांनी अनेक कारणास्तव आपली घरं बदलली असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील गृहप्रकल्प 26 टक्क्यांनी वाढले

पुणे : कोरोनाच्या परिस्थितीतून सावरत असलेल्या बांधकाम क्षेत्रात सकारात्मक चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पुण्यात सुरू झालेल्या गृहप्रकल्पांची टक्केवारी 26.3 टक्क्याने वाढली आहे. गेल्या सहा महिन्यांतील चित्र बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा देणारे असल्याचे अग्रगण्य ऑनलाइन रिअल इस्टेट ब्रोकरेज फर्म ‘प्रॉप टायगर’ने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. बांधकाम क्षेत्रात व्यवहारांना गती प्राप्त होत आहे.

जानेवारी-जून 2021 दरम्यान शहरात एकूण 12,558 युनिट्स असलेले गृहप्रकल्प सुरू झाले आहेत. गेल्या वषी याच काळात हा आकडा 9,944 होता. दोन्ही वर्षांची तुलना केली असता हा आकडा 26.3 टक्क्मयांनी वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जानेवारी ते जून 2020 दरम्यान पुण्यात 20,431 सदनिकांची विक्री झाली होती. यंदा ही संख्या 16,220 पर्यंत खाली आली आहे.

Related Stories

फॅशन उद्योगामध्ये तेजी

Patil_p

कॅस्ट्रॉल इंडियाच्या सीएफओपदी बक्षी

Omkar B

हुआई नफा कमाईत कपात करण्याच्या तयारीत

Patil_p

पहिल्या सहामाहीत सोने आयातीत घट

Patil_p

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या नफ्यात 10 टक्के वाढ

Amit Kulkarni

एमएसएमइएसला 8,320 कोटींचे कर्ज वितरण

Patil_p