Tarun Bharat

देशात 34,703 नवे बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पहायला मिळत आहे. सोमवारी देशात 34 हजार 703 नव्या संक्रमितांची नोंद झाली. मागील 111 दिवसातील दैनंदिन रुग्णवाढीचा हा सर्वात कमी आकडा आहे. मागील 24 तासात 51 हजार 864 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 553 रुग्ण दगावले. 

देशात आतापर्यंत 3 कोटी 06 लाख 19 हजार 932 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 97 लाख 52 हजार 294 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, रिकव्हरी रेट 97.17 टक्के आहे. सद्यस्थितीत देशात 4 लाख 64 हजार 357 उपचारार्थ रुग्ण आहेत. तर 4 लाख 03 हजार 281 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात आतापर्यंत 35.75 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. 

Related Stories

असदुद्दीन ओवेसींची प्रचारसभेत पोलिसांना धमकी; व्हिडीओ व्हायरल

Archana Banage

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून; शिंदे-फडणवीस सरकारची पहिली कसोटी

Archana Banage

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये गोळीबार, 10 जखमी

Patil_p

स्टोन क्रशरला परवानगी देऊ नये ;कलंबिस्त ग्रामस्थांचे निवेदन

Anuja Kudatarkar

हिमाचल प्रदेशात जानेवारी महिन्यात नेहमीपेक्षा 58 टक्के पाऊस कमी

Tousif Mujawar

दिग्गज अभिनेत्री पॅरिस हिल्टन विवाहबद्ध

Patil_p
error: Content is protected !!