Tarun Bharat

देशात 54,736 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 17.5 लाखांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 54 हजार 736 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 853 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17 लाख 50 हजार 724 वर पोहचली असून, मृतांची संख्या 37 हजार 364 एवढी आहे. 

सध्या देशात 5 लाख 67 हजार 730 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 11 लाख 45 हजार 630 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 98 लाख 21 हजार 831 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4 लाख 63 हजार 172 रुग्णांची तपासणी गुरुवारी एका दिवसात करण्यात आली.

महाराष्ट्रात आतापर्यंत 4 लाख 31 हजार 719 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 2 लाख 51 हजार 738, दिल्ली 1 लाख 36 हजार 716,गुजरातमध्ये 62 हजार 463, मध्यप्रदेश 32 हजार 614, आंध्र प्रदेश 1 लाख 50 हजार 209, बिहार 52 हजार 240, राजस्थान 42 हजार 646, उत्तरप्रदेश 89 हजार 048 तर पश्चिम बंगालमध्ये 72 हजार 777 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनिर्बंध नाही

Patil_p

गेहलोत-पायलट दोघेही काँग्रेससाठी बहुमूल्य

Patil_p

‘ईडब्ल्यूएस’ची बदलणार नाही उत्पन्नमर्यादा ?

Patil_p

रस्त्यांना देणार कारसेवकांचे नाव

Amit Kulkarni

नौदलाने जहाजातून केली ब्रह्मोसची चाचणी

Patil_p

जातीनिहाय जनगणनेसाठी दबावतंत्र

Patil_p