Tarun Bharat

देशाने नोंदवलाय अनपेक्षित रेकॉर्ड

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात 18 एप्रिलनंतर दैनंदिन रुग्णवाढीचा वेग वाढला असून, तो आजही कायम आहे. मृतांचा दैनंदिन आकडाही मागील आठवड्यापासून तीन हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झाला असून, देशाने एकूण रुग्णसंख्येचा 2 कोटींचा टप्पा ओलांडत अनपेक्षित रेकॉर्ड नोंदवला आहे.

दरम्यान, सोमवारी 3 लाख 57 हजार 229 नवे बाधित आढळून आले. तर 3449 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 2 कोटी 02 लाख 82 हजार 833 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 66 लाख 13 हजार 292 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 34 लाख 47 हजार 133 रुग्ण उपचार घेत असून, 2 लाख 22 हजार 408 रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

देशात आतापर्यंत 29 कोटी 33 लाख 10 हजार 779 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 16 लाख 63 हजार 742 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.03) करण्यात आल्या. 

Related Stories

‘ब्लॅक टॉप’ जवळचा भाग इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी घेतला ताब्यात

datta jadhav

झारखंड-बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा बंद

Amit Kulkarni

देशातील रुग्णसंख्या 10 लाखांच्या जवळ

Patil_p

दिल्लीत आजपासून 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी ‘जहां वोट, वहां वैक्सिनेशन’ अभियान

Tousif Mujawar

पाकिस्तानात चहा ही चैनीची वस्तू

Patil_p

जखमी माकडाची काळजी

Patil_p