Tarun Bharat

देशाला लवकरच मिळणार स्वदेशी लस; सरकारकडून 30 कोटी डोस बुक

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


कोरोना विरूध्दच्या लढाईत देशाला आणखी एक सफलता मिळणार आहे. लवकरच नागरिकांसाठी आणखी एक लस प्राप्त होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लशीच्या 30 कोटी डोससाठी हैदराबादस्थित लस उत्पादक बायोलॉजिकल-ई (Biological-E) कंपनीला 1500 कोटी रुपये ॲडव्हान्स देऊन बुक केली आहे. 

  • क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात लस 


मिळालेल्या माहितीनुसार, बायोलॉजिकल-ई द्वारा ऑगस्ट-डिसेंबर 2021 पर्यंत ही लस तयार केली जाईल आणि साठवली जाईल. फेज 1 आणि 2 क्लिनिकल चाचण्यांमध्ये सकारात्मक परिणाम दर्शविल्यानंतर, बायोलॉजिकल-ई कोव्हीड -19 लशीसाठी फेज 3 क्लिनिकल चाचणी घेण्यात येत आहे. बायोलॉजिक्स-ई द्वारा विकसित केलेली लस एक आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे. पुढील काही महिन्यांत ही उपलब्ध होईल.


बायोलॉजिकल-ई ला लशीच्या प्रिक्लिनिकल स्टेज ते फेज – 3 पर्यंत भारत सरकारने मदत केली आहे. ज्यासाठी जैव तंत्रज्ञान विभागाने 100 कोटींपेक्षा जास्त आर्थिक मदत दिली आहे. 


भारत सरकारने जून महिन्यात 1 कोटी नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच Pfizer आणि Moderna सारख्या परदेशी लस लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 

Related Stories

‘तरूण भारत सन्मान’ ९ जणांना जाहीर

Archana Banage

ममता बॅनर्जी यांचे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधींना पत्र; म्हणाल्या…

Tousif Mujawar

सोपोरमध्ये ग्रेनेड हल्ला; 2 पोलीस जखमी

datta jadhav

लाल किल्ल्यावरील हिंसाचार एक पूर्वनियोजित कट

datta jadhav

महाराष्ट्रात नवी नियमावली लागू

datta jadhav

कोरोनाचा प्रभाव : विमान कंपन्यांना 113 अब्ज डॉलरच्या नुकसानीचे संकेत

tarunbharat
error: Content is protected !!