Tarun Bharat

देशासाठी गायक सुखविंदर सिंग यांची साद

तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाचा नावलौकिक आहे. या युवा शक्तीच्या जोरावर आपण विविध क्षेत्रातील यशाची शिखरे सर केली आहेत. निर्णय क्षमता, बदल घडवून आणण्याची जिद्द ही या नव्या पिढीची वैशिष्टय़े आहेत. समाजात बदल घडविण्यासाठी धडपडणारी तरुणाई काय करू शकते हे मनोरंजकरीत्या दाखवून देणारा कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित मेरे देश की धरती हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटातील गायक सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील रोमांचकारी देशभक्तीपर गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या गाण्याबद्दल बोलताना कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ आणि संचालिका वैशाली सरवणकर म्हणाल्या की, देशाभिमान जागरूक करणारे हे गाणं प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत असून हा टायटल ट्रक टीझर प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास त्या व्यक्त करतात. जिसका हर दिन सुनेहरा… जिसका हर दिल मैं बसेरा…जिसका बस नाम है काफी…ऐसा बस देश है मेरा… असे या गाण्याचे बोल आहेत. देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे गाणे गीतकार अझीम शिराझी यांनी लिहिले असून विक्रम मोंट्रोसे यांनी संगीतबद्ध केलं आहे. दिव्यांदू ,अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या तरुण कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आले आहे. मातीचा स्पर्श काही वेगळाच असतो. या मातीने आजवर अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली आहे. माझ्या या गाण्यातील आपल्या देशाची आणि त्या मातीच्या गोडव्याची जादू प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करेल असा विश्वास गायक सुखविंदर सिंग व्यक्त करतात. मेरे देश की धरती चित्रपटाचं दिग्दर्शन फराज हैदर यांनी केलं आहे. दिव्यांदू, अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका यांच्यासोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांनीही या चित्रपटात अभिनय केला आहे. मेरे देश की धरती या चित्रपटाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. दोन इंजिनिअर्स आणि त्यांच्या बदलत जाणाऱया जीवन प्रवासाचे लक्षवेधी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

Related Stories

‘देवों के देव महादेव’ फेम मोहित रैना याला कोरोनाची लागण

Tousif Mujawar

अँजेलिना जोलीचे धोकादायक फोटोशूट

Patil_p

‘मैं अटल हूं’…पंकज त्रिपाठी अटलबिहारी वाजपेयींच्या रुपात

Abhijeet Khandekar

‘जय जय महाराष्ट्र माझा’मध्ये लावण्यांचा उत्सव

Patil_p

सायली-सिद्धार्थची जोडी थिरकणार

Patil_p

अमिताभ यांना स्टाईल आवडली याचा आनंद- सचिन खेडेकर

Archana Banage