Tarun Bharat

देशी दारू अड्ड्यावर शाहूवाडी पोलिसांचा छापा

शाहूवाडी /प्रतिनिधी       

वारूऴ ता. शाहूवाडी येथे  बीएसएनएल टॉवर परिसरात खुल्या जागेतील बेकायदा अवैध देशी दारू अड्ड्यावर शाहूवाडी पोलिसांनी छापा टाकून ६ हजार ५३२ रुपयांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी दिनेश पांडुरंग तावरे (वय ४३, रा. वारूऴ, ता. शाहूवाडी) या संशयिताविरुद्ध शाहुवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 
 
संशयित आरोपी दिनेश तावरे हा वारूळ परिसरात विनापरवाना, बेकायदा देशी दारूचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शाहूवाडी सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.पोलीस कर्मचारी रविंद्र राजाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

आपत्तीग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करावे

Patil_p

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सिलिंडरचा स्फोट; नवजात बालकांना इजा

datta jadhav

शरद पवारांनी स्वप्न पाहू नये-केसरकरांचे टीकास्त्र

Abhijeet Khandekar

यशवंतराव चव्हाण यांचा वारसा चालविणार

Patil_p

कोल्हापूर : करवीर तहसीलदारांच्या करवीर तालुक्यातील गावांना भेटी

Archana Banage

पुरातत्व विभागाला जाग, ढासळणाऱया पन्हाळ्याचे ‘पुरातत्व’कडून तातडीने सर्वेक्षण सुरु

Rahul Gadkar