Tarun Bharat

देश सोडून पळून गेल्यानंतर पहिल्यांदाच समोर आले अशरफ घनी, म्हणाले…

Advertisements


काबुल \ ऑनलाईन टीम

तालिबानने अफगाणिस्तानच्या काबुलपर्यंत सत्ता काबीज करताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन केले. मात्र देशाबाहेर पलायन करताना अशरफ घनी यांनी चार कार आणि हेलिकॉप्टर भरून पैसासोबत नेला. हेलिकॉप्टरमध्ये पैसा ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे नाईलाजाने त्यांनी काही रक्कम मागे सोडल्यासह अनेक आरोप केले जात आहेत. मात्र राष्ट्रपती अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानमधून पैसा घेऊन पळून गेल्याचे त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. अशरफ घनी यांना एका नवा व्हिडिओ पोस्ट करत यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

चार गाड्या भरुन पैसे सोबत घेऊन गेल्याचे आरोप खोडून काढताना घनी यांनी कशा परिस्थितीत आपण देशातून पलायन केलं याबद्दल भाष्य केलं. “मी एवढ्या तातडीने देश सोडला की मला माझ्या सिपर्स आणि बूट सोबत घेण्यासही वेळ मिळाला नाही. एक पारंपारिक कपड्यांचा जोड, एक कोट आणि घातलेल्या सॅण्डल एवढ्या तीन गोष्टी सोबत घेऊन मी देश सोडला,” असा दावा घनी यांनी केलाय. फेसबुकवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये घनी यांनी आपण देशामध्येच थांबलो असतो तर आपली हत्या झाली असती अशी भीती व्यक्त केलीय. “मी तिथेच थांबलो असतो तर अफगाणी जतनेच्या डोळ्यांसमोरच त्यांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्षाला पुन्हा फासावर लटकवलं असतं,” असं घनी यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

अशरफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडल्यानंतर संयुक्त अरब अमिरातमध्ये आश्रय घेतला आहे. युएई परराष्ट्र मंत्रालयाने अशरफ घनी त्यांच्या कुटुंबियांसह अरब अमिरातमध्ये असल्याची अधिकृत घोषणा केली. यूएई सरकारच्या म्हणण्यानुसार, घनी आणि त्यांचा कुटुंबियांना मानवी आधारावर आश्रय देण्यात आला आहे.

२० वर्षांच्या लढाईनंतर अखेर रविवारी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. दरम्यान राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून पळून गेलेल्यांमध्ये आहेत.

Related Stories

जम्मू काश्मीर मध्ये चकमकीत 5 जवान शहीद, 5 दहशतवाद्यांचा खात्मा

prashant_c

महाराष्ट्रातील लॉकडाऊन सरसकट उठवणार नाही, शिथिलता देण्यात येणार – राजेश टोपे

Abhijeet Shinde

तृणमूल-भाजपच्या लढाईत डाव्यांची भूमिका महत्त्वाची

Patil_p

‘इस्रो’ने अंतराळात पाठवले 10 उपग्रह

Patil_p

ऑपरेशन द लंडन ब्रिज लीक

Patil_p

‘एमबीबीएस-फायनल’चे विद्यार्थी कोविड सेवेत ?

Patil_p
error: Content is protected !!