Tarun Bharat

”दैदिप्यमान कामगिरीमुळेच चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर सोडाव लागलं”

मुंबई / ऑनलाईन टीम

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर सातत्याने केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेतला. चाकणकर यांनी एक ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यात कोरोना सारख संकट सातत्याने नागरिकांच्यावर घोंघावत असताना याला बघुन घेऊ, त्याला महागात पडेल, याच्यावर गुन्हा दाखल करा, याला आत टाका यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी आजपर्यंत पीएचडी तर पूर्ण केली आहेच. पण यात आपली आता एमफील ही पूर्ण केली असल्याचं त्या म्हणाल्या.

ज्यांना आपल्या गावची ग्रामपंचायत निवडणूक ही जिंकता आली नाही.त्याचबरोबर कोल्हापुरातील पूर परिस्थिती दरम्यान केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे, आपल्याला आपला मतदार संघ सोडावा लागला होता. यामुळेत तर चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला होतो. याचा आपण पुर्नआवलोकन करत विचार करावा, तसेच आपल्या पक्षातील जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा अशा घोटाळ्यांचा ही विचार करावा असे त्या म्हणाल्या.

सद्य स्थितीत राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात यावा या करीता महाविकास आघाडीसाठी प्रयत्न करत आहे. त्यामूळेच आम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहोत. चंद्रकांत पाटील यांनी इतरांवर टीका करताना प्रथम आपल्या सहकाऱ्यांचे घोटाळ्यांकडे पाहावे असे ही त्या म्हणाल्या.

Related Stories

ISRO PSLV: इस्रोची नवीन ‘गगन भरारी’, ओशनसॅट-३ सह ८ नॅनो सॅटेलाइटचं प्रक्षेपण

Archana Banage

महावितरणच्या कंत्राटी कामगाराच्या पैशावर डल्ला

Patil_p

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार पार

Tousif Mujawar

कोल्हापूरसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना : राज्यमंत्री यड्रावकर

Archana Banage

महाराष्ट्र : मंदिरांसह हॉटेलांबाबतचा निर्णय आज शक्य

Archana Banage

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण ; राज ठाकरेंकडून शुभेच्छा देत सन्मान

Archana Banage