Tarun Bharat

दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेतर्फे नाना शंकरशेठ जयंती साजरी

प्रतिनिधी/ बेळगाव

दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था व श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. पेडिट सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटीच्या सभागृहात कै. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांची 219 वी जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर, प्रमुख पाहुणे प्रदीप अर्कसाली, संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर, व्हा. चेअरमन विजय सांबरेकर तसेच दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर उपस्थित होते.

पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विनायक कारेकर यांनी प्रमुख पाहुणे प्रदीप अर्कसाली यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी पिढीजात सुवर्ण श्रीमंत घराण्यात जन्मलेल्या नानांनी समाजातील गरीब व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी शैक्षणिक व आर्थिक मदत केली. स्त्री शिक्षणाला प्राधान्य देऊन महाविद्यालयाची स्थापना केली. मुंबई शहराची जडणघडण करण्यात नानांनी मोठे योगदान दिले आहे, असे सांगितले.

यावेळी संस्थेच्या संचालिका मधुरा शिरोडकर यांनीही आपले विचार मांडले. यावेळी संचालक प्रकाश वेर्णेकर, समर्थ कारेकर, राजू बांदिवडेकर, विराज सांबरेकर यांच्यासह अमित हेरेकर, सतीश चंदगडकर, लता बांदिवडेकर, संस्थेचे कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते.  सेपेटरी अभय हळदणकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Stories

डेनेजमिश्रित पाणी मिसळल्याने विहिरांचे पाणी दूषित

Amit Kulkarni

मतदानाचा टक्का घटला

Amit Kulkarni

विभागीय क्रीडा स्पर्धेत शिवाजी हायस्कूल कडोलीला यश

Amit Kulkarni

प्रवेश वाढले; पण सुविधांचा अभाव

Amit Kulkarni

जायंट्स मेन संस्थेचे कार्य गौरवास्पद

Amit Kulkarni

कडोली गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी

Amit Kulkarni