प्रतिनिधी/ बेळगाव
उद्यमबाग पोलिसांनी गुरूवारी दोघा मटकाबुकींना अटक केली आहे. त्यांच्या जवळून 6 हजार 890 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.
पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी व त्यांच्या सहकाऱयांनी गुरूवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे. चंद्रहास राघू पुजारी (रा. पार्वतीनगर), रमजान शौकत मोपदार (रा. अनगोळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 78(3) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.