Tarun Bharat

दोडामार्गच्या श्रुती गवस ची अमेरिकेतील एव्हरी डेनिसन फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी निवड

दोडामार्ग – वार्ताहर-

भिकेकोनाळ गावच्या श्रुती सुरेश गवस ची अमेरिकेतील एव्हरी डेनिसन फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
सध्या पुणयातील नामांकीत कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये इएनटीसी या साईड मध्ये शिकत असलेल्या श्रुती सुरेश गवस (वय वर्ष १९) या विद्यार्थिनींने अनथा आश्रमातील लहान मुलांचे संगोपन हे आधुनिक शास्त्राची जोड देऊन कसे करता येईल या विषयावर एक प्रोग्राम बनवून कॉलेजच्यावतीने तो सादर केला.

या विषयातील गांभीर्य, सखोल अभ्यास व शास्त्राची जोड असलेला प्रोग्राम कंपनीला अतिशय आवडला. ४५ मिनिटांच्या ६ तज्ञ लोकांनी घेतलेल्या मुलाखती नंतर तिला एव्हरी डेनिसन कैलिफोर्निया या कंपनीने 1300 यूएसडी म्हणजेच एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली. विशेष म्हणजे संपुर्ण भारत भरातून पंधराच मुले निवडली जातात. यामध्ये श्रुतीची निवड झाली आहे.

श्रुती ही भिकेकोनाळ गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व घराण्यातच समाज कार्याचे बाळकडू असलेल्या लाडोबा गवस यांची नात आहे.  एवढ्या लहान वयात समाजातील अशा नाजूक विषयाची जाण व त्यांवर अतिशय मेहनत घेऊन बनवलेलया प्रकल्पासाठी तीचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. तसेच या मिळालेल्या पैशातून एखाद्या अनाथ आश्रमासाठी अशाच प्रकारावंग एक प्रकल्प ऊभा करायचा आहे अशी भावना तीने व्यक्त केली. मिळालेल्या पुरस्कारासाठी तिने आपले आई वडील, गवस कुटूंब, शिक्षक वर्ग व मित्र परिवाराचे आभार मानले.

Related Stories

बोर्डच्या सूचनेनुसार कसाल न्यू इंग्लिश स्कूल येथील बारावी परीक्षेच्या दोन पेपरसाठी केंद्राच्या स्थानात बदल

Anuja Kudatarkar

सिंधुदुर्गची सुकन्या कॅनडात अनुभवतेय आणीबाणी

NIKHIL_N

जिल्हा रुग्णालयातील २ नातेवाईकांसह, शहरातील विद्यार्थी पॉझिटिव्ह

Archana Banage

दोडामार्ग रुग्णालय इमारत नुतनीकरण १५ ऑगस्टपर्यंत होणार

Anuja Kudatarkar

जिह्यात कोरोनाचे तब्बल 23 नवे रूग्ण

Patil_p

रत्नागिरी (दापोली) : वीज ग्राहकांना वीज बिलांचा भूर्दंड कायम

Archana Banage