Tarun Bharat

दोडामार्गमधून 138 परप्रांतीय कामगार रवाना

Advertisements

वार्ताहर / दोडामार्ग:

राज्य तसेच सिंधुदुर्ग जिह्यातील परप्रांतीय मजूर, कामगारांना श्रमिक रेल्वेद्वारे त्यांच्या राज्यातील मूळ गावी पाठविले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दोडामार्गातून जवळपास 138 परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी उत्तरप्रदेशला पाठविण्यात आले. या तसेच या सर्वांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल तहसीलदार मोरेश्वर हाडके यांचे आभार मानले.

सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यांमधून उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान आदी ठिकाणांहून जे मजूर व कामगार जिह्यात कामानिमित्त राहत होते. त्या सर्वांना त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या मूळगावी पाठविले जात आहे. रेल्वे मंत्रालयाने अशा लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या श्रमिक रेल्वेद्वारे हे मजूर कामगार लोक आपल्या इच्छितस्थळी पोहोचत आहेत. गेल्या आठवडय़ात दोडामार्गातून राजस्थानमध्ये जवळजवळ 46 मजुरांना पाठविले होते. तर आज फक्त उत्तरप्रदेश मध्ये जाऊ इच्छिणाया एकूण 138 मजुरांना पाठविण्यात आले. आपल्या मूळ गावी जाऊ इच्छिणाऱयांसाठी ओरस रेल्वेस्थानकापर्यंत एसटी महामंडळाने शुक्रवारी 12 एसटी बसेसची सोय केली होती. दोडामार्ग बस स्थानकात सकाळपासून मूळ गावी जाणाऱया दोडामार्ग तालुक्यातील मजूर कामगार व तहसीलदार मोरेश्वर हाडके यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

दापोलीत पाच पोलीस कुटुंबाला डेंग्यूची लागण

Abhijeet Shinde

एसटीची कोटय़वधीची मालमत्ता विक्रीस, भाडय़ाने?

NIKHIL_N

समीर लब्दे यांची शिवसेना आचरा विभागप्रमुखपदी निवड

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी विभागातून आणखी 4 कर्मचारी निलंबित

Patil_p

रत्नागिरी नगर परिषद आवारात इलेक्ट्रीक वाहनांसाठी ‘चार्जिंग पॉईंट’

Patil_p

डॉक्टर उद्या नोंदविणार निषेध

NIKHIL_N
error: Content is protected !!