Tarun Bharat

दोडामार्ग बाजारपेठेत पुन्हा अग्नितांडव

गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी तीन दुचाकी होरपळल्या : 25 लाखांहून अधिक हानी

वार्ताहर / दोडामार्ग:

तब्बल दीड-दोन वर्षानंतर दोडामार्ग बाजारपेठेत रविवारी रात्री उशिरा पुन्हा अग्नितांडव झाले. बाजारपेठेतील आयी रोडलगतचे एक गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत गॅरेजमधील ऑइल, टायर्स, बॅटऱया व इतर सामग्री जळून खाक झाली. तसेच गॅरेजमधील तीन दुचाकी देखील या आगीत होरपळलेल्या. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून नुकसानीचा आकडा 25 लाखावर पोहोचला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाजारपेठेतील आयी रोडवर जनता बाजार लेनमध्ये अनंत उर्फ मंदार मोहन मणेरीकर यांचे दुचाकी गॅरेज आहे. रविवारी रात्री उशिरा या गॅरेजला आग लागली. मात्र, सकाळपर्यंत याबाबत कुणालाच माहीत झाले नाही. सकाळी आजूबाजूच्या लोकांना आगीचा धूर दिसतात. त्यांनी तात्काळ मणेरीकर यांच्याशी संपर्क साधला व आग लागल्याचे सांगितले. या आगीत गॅरेजमधील संपूर्ण साधनसामग्री भक्ष्यस्थानी पडली. त्यात टायर्स, ऑइल, बॅटऱया व इतर सामग्रीचा समावेश आहे. गॅरेजच्या बाहेर ठेवलेल्या तीन दुचाकी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

 रात्री उशिरा लागली आग

हे गॅरेज बाजारपेठे परिसरात भर वस्तीमध्ये असून या गॅरेजलगत अन्य बरीच दुकाने, घरे व जनता ग्राहक बाजार नावाचे सुपर मार्केट आहे. सुदैवाने या आगीची झळ लगतच्या या दुकानांना बसली नाही. ही आग बहुधा रात्री उशिरा लागल्याने कोणाला त्याबाबत माहिती मिळू शकली नाही. सकाळीच या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी घटनास्थळी पाहणी केली. नानचे यांनी नगरपंचायत, महसूल तसेच पोलीस प्रशासनाला या घटनेची तात्काळ माहिती दिली

जनता बाजार इमारत सुदैवाने बचावली

मणेरीकर यांचे हे गॅरेज जनता बाजार इमारतीमध्ये आहे. या गॅरेजला लागलेल्या आगीची भीषणता एवढी होती की, या जनता बाजार इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील संपूर्ण भाग अशरक्ष: कालवंडला होता. शिवाय इमारातीच्या भिंतीचा काही भाग हा देखील आगीच्या ज्वालांमुळे ढासळल्याचे पाहायला मिळाले. गॅरेजमधिल लोखंडी रेक तसेच अन्य लोखंडी सामग्री ही अक्षरशः वाकलेली होती. या गॅरेजला लागुन चप्पल, कॉस्मॅटीक्स, तसेच अन्य दुकाने होती. ती सुदैवाने या आगीपासून बचावली आहेत.

 नुकसानीचा आकडा 25 लाखापर्यंत

दरम्यान, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली सामग्री अर्थात ऑईल, टायर्स, बॅटऱया तसेच तीन दुचाक्या वगैरेची नुकसानी पाहता जवळ-जवळ 25 लाख रुपयांची नुकसानी झाल्याची माहिती मणेरीकर यांनी दिली.

Related Stories

राज्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट

Archana Banage

अनेक विद्यमान नगरसेवकांना फटका

NIKHIL_N

गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारी गाडी पकडली

Patil_p

जनशताब्दी आता ‘सीएसएमटी’वरून धावणार

NIKHIL_N

कासार्डेत उड्डाण पुलाच्या भिंतीला तडे

NIKHIL_N

कोल्हापूर चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह झोनमध्ये वाघाने ‘या’ ठिकाणी केली शिकार

Abhijeet Khandekar