Tarun Bharat

दोडामार्ग बाजारपेठेत सत्यनारायण पुजांना उत्साहात प्रारंभ

Advertisements


दोडामार्ग / वार्ताहर:


दोडामार्ग बाजारपेठेतील आराध्य दैवत श्री पिंपळेश्वर देवस्थानात श्रावण महिन्यातील महापुजांना आजपासून प्रारंभ झाला. शहरातील रिक्शा तसेच टेंपो चालक मालक संघाची पहिली सत्यनारायण पूजा आज संपन्न झाली. बऱ्याच दिवसांनी बाजारपेठ परिसरात चैतन्याचे व मंगलमय वातावरण पहावयास मिळाले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याच्या पार्श्वभूमीवर शहारासहित बाजारपेठेचेही जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.


गेल्यावर्षी तसेच यंदाही लॉकडाऊनमुळे दोडामार्ग बाजारपेठेचे जनजीवन विस्कळीत झाले होते. लॉकडाऊन काळात अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय बंद राहिल्याने व्यापारी वर्ग चिंतेत सापडला होता. मार्च ते मे हे तीन हंगामी महिने देखील लॉकडाऊन मध्ये अडकल्याने बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रश्न उभा राहिला होता. फुले, फळे तसेच किरकोळ व घाऊक भाजी विक्रेते यासोबत अनेकांना या लॉकडाऊनची झळ बसली होती. मात्र सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील बाजारपेठांच्या मर्यादित वेळा रात्री 10 वाजेपर्यंत वाढवून दिल्याने. जिल्ह्यातील अनेक बाजारपेठासोबत दोडामार्ग बाजारपेठेचेही स्वरूप हळूहळू पालटू लागले आहे. काही नवनवीन दुकाने सुद्धा उद्घाटनांद्वारे सुरू झाली आहेत. गोवा तसेच महाराष्ट्र सरकारच्या प्रवासी बसेस तसेच खाजगी मिनी बसेस अद्याप जरी सुरू झालेल्या नसल्या तरी स्वतःच्या खाजगी वाहनाने मात्र गोवा व दोडामार्गच्या सीमावर्ती भागातील लोकांची वर्दळ शहरात सुरू झाली आहे. गतवर्षी बाजारपेठेतील पिंपलेश्वर देवस्थानाकडे होणाऱ्या सार्वजनिक महापूजावर अनेक बंधने होती मात्र यंदा लॉकडाऊनचे अटी नियम व सोशल डिस्टनसिंग पाळत या पुजांना आजपासून उत्साहात सुरुवात झाली. आज गुरुवारी रिक्शा व टेंपो चालक मालक यांची पूजा संपन्न झाली. तर पुढील दिवसांत मोटारसायकल धारक, व्यपारी, वगैरेंच्या पूजा होणार आहेत.

Related Stories

दागिने चोरी, तपासात प्रगती नाही

Patil_p

जयगड मार्गावरील अवजड वाहतूक बंदच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम

Patil_p

आनंददायी उजळणीसाठी जिल्ह्य़ातील अंगणवाडय़ा बनल्या ‘स्मार्ट’

Patil_p

खवलेमांजर खवले तक्रीरि प्रकरनातील अजून एका साथीदाराला अटक

Patil_p

सिंधुदुर्गात दुर्मीळ ‘देव जांभुळ’ वनस्पतीचे अस्तित्व

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात ३२ वा बळी नव्याने ३५ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!