Tarun Bharat

दोन्ही राजांमध्ये वाद नाहीत

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण, आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार

प्रतिनिधी/सातारा

साताऱ्यातील दोन्ही राजांमध्ये होणारे प्रसंग तसेच बुधवारी झालेल्या राजे समर्थक राड्याच्या अनुषंगाने विचारले असताना दोन्ही राजांमध्ये कोणताही वाद नाही. किरकोळ वाद असतो तो संपवून पुढे जाता येते. त्याचबरोबर पालिकेसह आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाला की ईव्हीएम मशिन चांगली आणि आसाममध्ये भाजपाचा विजय झाला की तेथे ईव्हीएम मशिन वाईट. आपल्या सोयीनुसार जे त्यांच्यासाठी फायद्याचे आहे ते चांगले, अशा शब्दात डाव्यांसह महाविकास आघाडीचे नाव न घेता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फटकारले. भुजबळांना नेमकी क्लिनचिट कशाची दिली ते पाहायला पाहिजे. मी सामान्य माणूस आहे. ईडी, सीबीआय, इनकमटॅक्स हे त्यांच त्यांचे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले. नाना पाटोले यांनी केलेल्या आरोपांवरांच्या प्रश्नांवर चंद्रकांत पाटील यांनी त्यांना कोणी अडवलय का?, असा प्रतिप्रश्न केला. 

साताऱ्याच्या दौऱ्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी रात्री उशिरा संवाद साधताना बोलत होते. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, धंनजय जांभळे, विठ्ठल बलशेठवार, राहुल शिवनामे, विजय काटवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालिका निवडणुका स्वबळावर लढणार  

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपाकडून कोवीडचे नियम पाळून बुथ कमिटÎांशी संवाद साधण्याचे काम सुरु आहे. श्याम प्रसाद मुखर्जी समर्थ बुध अभियानात सदस्यांची समिती स्थापन करुन 2,978 बुथ सक्षम झाले पाहिजेत. यासाठी संपर्क अभियान सुरु आहे. 7 ऑक्टोबरला राज्याचे प्रभारी सीपी रवी हे 24 लाख लोकांशी बोलणर आहेत. मोदीजी स्वतः 7 जानेवारीला 1 कोटी 44 लाख लोकांशी बोलणार आहेत. त्याच माध्यमातून येवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणूका स्वबळावर लढवण्याची तयारी करण्याचे आदेश दिले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले.

भुजबळांकडे 100 कोटींची प्रॉपर्टी कशी काय?

काही पत्रकारांनी छगन भुजबळांना क्लिन चिट मिळाल्याबाबत प्रश्न छेडला असता चंद्रकांत पाटील म्हणाले, एका बाजूने छगन भुजबळांना क्लिन चिट मिळाल्याचे कळते आहे. जसे अनिल देशमुखानांही चार दिवसांपूर्वी मिळाली होती. मला त्याच्या खोलात जायचे नाही. पण दुसऱया बाजूला गेल्या आठवडÎात छगन भुजबळांची 100 कोटीची प्रॉपर्टी इनकम टॅक्सने जप्त केली. एका व्यक्तीकडे 100 कोटींची प्रापर्टी कशी येते. नेमकी क्लिनचिट म्हणजे काय बघायला पाहिजे. हा माझा विषय नाही. ईडी, सीबीआय, इनकमटॅक्स हे त्यांचे त्यांचे काम करते, असे त्यांनी सांगितले.

भांडÎाला भांडं लागतं म्हणून काय घर फुटत नसतं

दोन्ही राजांमध्ये वाद आहे का या प्रश्नावर ते म्हणाले, माणुस म्हणला की कुटुंब आले. एखाद्या कुटुंबात आठ माणसे असतील तर नवरा, बायको, आईबाबा असतील तर भांडÎाला भांडं लागत असते. म्हणून काय घर फुटत नसते. समजोता काढून पुढे जात असते. असे उदाहरण सांगत दोन्ही राजांमध्ये वाद वगैरे नाहीत, असा दावा केला.

पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांचा घेतला समाचार

पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पाटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरुन पत्रकारांनी छेडले असता जे स्वतःच्या फायद्याचे आहे ते चांगले. बंगालमध्ये बीजेपीचा पराभव झाला तेव्हा ईव्हीएम चांगले. आसाममध्ये बीजेपी जिंकली की ईव्हीएम वाईट. सोयीनुसार चालले आहे, अशा शब्दात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नी पत्रकारास उत्तर दिले तर नाना पाटोले यांच्या प्रश्नांवर त्यांना कोणी अडवले आहे, अशा शब्दात फटकारले आहे.

Related Stories

गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीने सातारकर त्रस्त

Patil_p

राम मंदिरासाठी 2,100 कोटींचे निधी संकलन

Patil_p

मतांसाठी आमदारांना ‘टाटा सफारी’ची ऑफर

datta jadhav

जेव्हा नगरसेवक ठेकेदाराची फिरकी घेतात तेव्हा? पगार वेळेवर होत असल्याची ठेकेदाराची कबुली

Amit Kulkarni

महाराष्ट्र : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

नारी शक्तीचा बुलंद आवाज सुनिशा शहा

datta jadhav