Tarun Bharat

दोन खलिस्तानवाद्यांची संपत्ती होणार जप्त

एनआयए करणार कारवाई, शीख फॉर जस्टीस या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकास्थित शीख फॉर जस्टीस व कॅनडास्थित खलिस्तान टायगर फोर्स या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असलेल्या दोघा खलिस्तानवाद्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. गुरपतवंत सिंग पन्नून आणि हरदीप सिंग निज्जर अशी या दोन खलिस्तानवाद्यांची नावे आहेत. ही कारवाई राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे.

एनआयएच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार या खलिस्तानवाद्यांवर अन लॉफुल ऍक्टीव्हीटिज प्रिव्हेंटेशन (युएपीए) या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. पन्नून याची अमृतसर येथील आणि जालंदर येथील निज्जर याची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जुलै महिन्यात युएपीएअंतर्गत त्यांना दहशतवादी घोषित केले होते. एसएफजे आणि खलिस्तान टायगर फोर्स या दोन्हीही खलिस्तानवादी संघटना आहेत.

Related Stories

लालूंच्या घरासह १५ ठिकाणांवर CBI चे छापे

Archana Banage

आता ‘खेला होबे’चा आवाज देशभर ऐकू जाणार – ममता बॅनर्जी

Archana Banage

भारतात 2 कोटी नोकरदारांना फटका

Patil_p

सेन्सेक्सची 379 अंकांची मजबूत स्थिती

Patil_p

पंतप्रधान मोदी २४ ऑक्टोबर रोजी देशवासियांशी साधणार ‘मन की बात’

Archana Banage

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात

Tousif Mujawar