Tarun Bharat

दोन ‘छोटे’ पोलीस जाळय़ात, अजून दोघे रडारवर

Advertisements

पोलीस – ड्रग्ज माफिया यांचे साटेलोटे पुन्हा चव्हाटय़ावर : माफियाकडून विदेशी चलन, लाच उकळलेले दोघे पोलीस निलंबीत

प्रतिनिधी /पणजी

गोव्यात मोठय़ाप्रमाणात ड्रग्ज फोफावण्याचे मुख्य कारण म्हणजे पोलीस आणि ड्रग्ज माफियांशी असलेले साटेलोटे आता पुन्हा एकदा उघड झाले आहे. राजकीय नेत्यांबरोबरच पोलिसांच्या कृपेनेच राज्यात ड्रग्ज व्यवसाय सुरु असल्याचे पुन्हा पुन्हा दिसून येत आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक न करण्याच्या अटीवर पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्याकडून पैसे उकळल्याचे उघड झाल्याने दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आले असून कोणत्याही क्षणी अजून दोन पोलिसांचे निलबन होऊ शकते.

केवळ दोन पोलिसांना निलंबीत करून हा प्रकार आटोपता येणार नाही तर त्यासाठी मोठे जाळे विणावे लागेल अनेक ‘मोठे मासे’ त्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाचप्रकरणी दोघे निलंबीत

काही दिवसांपूर्वी हरमल येथे छापा टाकून ड्रग्जप्रकरणी पेडणे पोलिसांनी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिकाकडून लाच घेतल्याप्रकरणी पेडणे पोलीस स्थानकातील हवालदार राजेश येशी आणि कॉन्स्टेबल आपा परब यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.

आणखी दोघांवर शेकणार प्रकरण

ड्रग्स माफियाशी साटेलोटे करून त्याच्याकडील हजारो रुपये किमंतीचे विदेशी चलन परस्पर हडप केल्याप्रकरणी पेडणे पोलीस स्थानकातील अन्य एक कॉन्स्टेबल आणि एक अधिकारी यांच्यावरही हे प्रकरण शेकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पंधरा लाखांचे ड्रग्ज केले होते जप्त

पेडणे पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी हरमल येथे छापा मारून स्टिफन स्लोटविनर (76) या ब्रिटिश नागरिकाला अटक केली होती. त्याच्याकडून गांजा, एमडीएमए, एसएसडी पेपर्स, एलएसडी पॅप्सूल असे विविध प्रकारचे सुमारे 15 लाख रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते.

विदेशी चलनासह पन्नास हजार उकळले

या ब्रिटिश नागरिकावर कारवाई होण्याअगोदर काही दिवसांपूर्वी अटक होऊ नये, यासाठी दोन पोलिसांना 50 हजार रुपयांची लाच दिली होती. शिवाय अनेकदा विविध पोलीस विभागातील पोलिसांना लाच दिली होती. कारवाई करताना सुमारे तीन लाख रुपये किमंतीचे विदेशी चलनही पोलिसांनी जप्त केले होते, अशी माहिती त्या ड्रग्स माफियाने वरिष्ठ पोलिसांना दिली होती.

ब्रिटिश नागरिकाकडील विदेशी चलन हडप केलेले पोलीस अद्याप मोकळे फिरत असल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे. एक कॉन्स्टेबल आणि एक अधिकारी चौकशी अधिकाऱयांच्या रडारावर असून त्यांचे धाबे दणाणले आहेत.

ड्रग्ज माफियानेच केला पोलिसांचा भांडाफोड

कारवाई केल्यानंतर ब्रिटीश नागरिकाला पोलीस मुख्यालयात आणून त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने लाचखोर पोलिसांचा भांडाफोड केला होता. आपल्याला अटक होऊ नये यासाठी पोलिसांना पैसे दिल्याचे त्याने वरिष्ठ पोलिसांसामोर उघड केले. त्याने दिलेल्या माहितीची शहानिशा करण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना दिला होता. त्यानुसार त्यांनी चौकशी करून लाच म्हणून दिलेली रक्कम जप्त केली. लाच घेणे, भ्रष्टाचार करणे असा ठपका ठेवत अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी हवालदार राजेश येशी आणि कॉन्स्टेबल आपा परब यांना निलंबीत केले आहे.

Related Stories

गोव्याच्या संरक्षणासाठी चळवळ तीव्र करणार

Omkar B

पी. चिदंबरम-दिनेश गुडूरांव आजपासून पुन्हा गोवा दौऱयावर

Amit Kulkarni

रावण सत्तरी भाजी उत्पादनात अग्रेसर

Patil_p

विर्डी सांखळीतील प्रसिद्व होमकुंड उत्सव आज

Amit Kulkarni

ईडीसीने अनेकांना स्वयंरोजगारसाठी आधार दिला

Omkar B

‘बिग बी’ कडून ‘कमला पसंद’चा करार रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!