Tarun Bharat

दोन वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

घाटणे ता माढा येथे दोन वर्षाच्या छोट्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि १९ रोजी संध्याकाळी सहा वा. पुर्वी घडली. शिवांश सचिन बागल वय २ वर्षे रा घाटणे ता माढा असे मयताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शिवांश हा आजीकडे घाटणे येथे गेला होता. शेतातच असलेल्या घरासमोर गुरांना पाणी पिण्यासाठी हौदाच्या आकाराच्या छोट्याश्या शेततळ्यात हा मुलगा खेळताखेळता पडला. त्याला उपचारासाठी कुर्डुवाडी येथील खासगी दवाखान्यात आणले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास हे.कॉ. पाटील हे करीत आहेत.

Related Stories

…आणि तो युवा महोत्सव आर्याचा अखेरचा ठरला

Abhijeet Khandekar

शासकीय सेवेत समयोजनासाठी डॉक्टरांचा बेमुदत संप सुरु

Archana Banage

ठिबक सिंचन अनुदान वाटपात करमाळा तालुका जिल्ह्यात अव्वल

Abhijeet Khandekar

पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान, सलग दुसऱ्या पेट्रोल पंपावर डिझेलची चोरी

Archana Banage

बार्शीत वाढले 109 रुग्ण, एकूण संख्या 295 वर

Archana Banage

कोरोना पार्श्वभूमीवर पंढरपूरात प्रतिदिन 1500 भाविकांना विठ्ठल दर्शन

Archana Banage