Tarun Bharat

दोन वर्षापासून बेपत्ता असलेल्या कुंभोजच्या तरुणाचा शोध

कोडोली पोलिसांनी चिंचणी येथे केली अटक

वारणानगर / प्रतिनिधी

कुंभोज येथे आपल्या आई – वडीलांना भेटण्यासाठी जात असल्याचे पत्नीस सांगून जाफळे ता. पन्हाळा येथून दोन वर्षापासून बेपत्ता झालेल्या अभिजीत संताजी कोळी वय-२४ ( रा.कुंभोज, ता.हातकणंगले ) याला रात्री कोडोली पोलीसांनी कर्नाटकातील चिंचणी येथे शोध घेवून त्याला अटक केली.

याबाबत कोडोली पोलीसांनी दिलेली माहिती अशी अभिजीत कोळी याचे मूळ गाव कुंभोज असून त्याने जाफळे येथील स्वाती या मुलीशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह त्याच्या आई वडीलांना मान्य नव्हता. विवाहानंतर तो जाफळे येथे सासरी रहावयास होता. दोन वर्षापूर्वी त्याने कुंभोज येथे आपल्या आई-वडीलांना भेटायला जातो म्हणून जाफळे येथून पत्नीला सांगून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही काही दिवसाने पत्नी स्वाती कोळी हिने कोडोली पोलीसात पती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.

दरम्यान त्यानंतर हातकणंगले व कोडोली पोलीसांनी शोध घेतला परंतू त्पाचा शोध लागला नाही. एक महिन्यापूर्वी कोडोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांच्याकडे हा तपास आला. कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक दिनेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी नरेंद्र पाटील यांनी व पोलिस कर्मचारी संभाजी खताळ, होमगार्ड अभिजीत देसाई यांनी कुंभोज, जाफळे अन्य ठिकाणी अभिजीत कोळी याच्या बद्दल चौकशी केली, त्यानंतर कर्नाटकातील चिंचणी येथे त्याचा मामा कृष्णात शिरोळे यांच्याकडे चौकशीअंती त्याचा शोध घेवून दोन वर्षापासून बेपत्ता असलेल्या या तरुणास अवघ्या एका महिन्याच्या आत शोधून काढतआज गुरवार दि. १ रोजी पोलीसांनी कोळी यास पत्नी स्वाती व आई -वडीलांच्या ताब्यात दिले.

Related Stories

खोची बंधार्‍याजवळ तब्बल ९ फूट मगर पकडली

Archana Banage

‘संयुक्त वन समितीच्या निधीची चौकशी करा’

Archana Banage

‘अलमट्टी’ तून अडीच लाख क्यूसेक विसर्ग

Archana Banage

पीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात टॉपवर

Archana Banage

गांधीनगरसह परिसरातील कोरोना रुग्ण संख्या २१० वर

Archana Banage

पालकमंत्री सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदारांशी व्हीसीव्दारे चर्चा

Archana Banage