Tarun Bharat

दोन वेगवेगळय़ा अपघातात एक ठार

Advertisements

निपाणीनजीकची घटना : मृत इदलहोंडचा, दोन गंभीर जखमी

प्रतिनिधी /निपाणी

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळय़ा अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास घडली. अनिल गंगाराम होलमनी (वय 40, रा. इदलहोंड, ता. खानापूर जि. बेळगाव) असे मृत आयशर ट्रक चालकाचे नाव आहे. तर भरमा शिवाजी कोले (वय 27, रा. बंबरगा जि. बेळगाव), मंजुनाथ मुगाप्पा बुदिहाळ (वय 32, रा. बेळगाव) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास मालवाहू ट्रक (आरजे/19/जीएफ/8951) निपाणी महामार्गावर 30 छाप विडी कारखान्यानजीकच्या गजानन पेट्रोलपंपासमोर थांबला होता.

त्यावेळी पाठीमागून येणारा आयशर ट्रक (केए/22/डी/5118) चालक भरमाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने बाजूला थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली.

या अपघातात अनिल होलमनी हा जागीच ठार झाला. तर भरमा कोले हा गंभीर जखमी झाला. जखमीला त्वरित महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच जय हिंद कंपनीचे निरीक्षक अमोल नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिली घेतली. सदर अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सदर वाहतूक कोंडी बाजूला करत असतानाच 100 मीटर अंतरावर दुसरा अपघात झाला. सदर अपघात ट्रक व टँकरमध्ये झाला. अपघातग्रस्त ट्रक (एमपी/29/एचएच/4863) हा बेळगावहून राजस्थानकडे जात होता. दरम्यान, पाठीमागून येणाऱया दूध टँकर (केए/22/सी/6070) ने ट्रकला जोराची धडक दिली. यामध्ये टँकर चालक मंजुनाथ बुदिहाळ हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मध्यरात्री महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनांची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार बसवराज नावी, एस. एस. चिकोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या अपघातात तीन वाहनांचे सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. सदर घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर करत आहेत.

Related Stories

शिकाऱयाच्या घरावर वनाधिकाऱयांचा छापा

Patil_p

अंध, दिव्यांग, ज्येष्ट नागरिकांची बसपासला वाढती मागणी

Amit Kulkarni

तालुक्यात विविध ठिकाणी बलिदान मासाला प्रारंभ

Amit Kulkarni

पशुसंगोपन सुरू करणार गो-शाळा

Amit Kulkarni

राष्ट्रीय स्पर्धेत इंडियन कराटे क्लबला सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni

कल्पना हंचीनमन्नी ‘कलाश्री’च्या विजेत्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!