Tarun Bharat

दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई – वारसनोंदीसाठी मागितली लाच

प्रतिनिधी/ सातारा

वारसदार म्हणून नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरकुटे-म्हसवड (ता. माण) येथील तलाठी दादासो अनिल नरळे, (वय 37, रा. पानवण, ता. माण) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांनी 3 हजार रुपयांची मागितली होती 2 हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, दादासो अनिल नरळे यांनी वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये तक्रारदार व त्यांची बहिण यांचे वारसदार नाव नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी करून वरकुटे येथे सापळा लावण्यात आला. त्यामध्ये दादासो नरळे दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अलगद जाळ्यात अडकले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के, पोलीस नाईक विनोद राजे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले यांनी केली आहे.

Related Stories

शिंगणापूरचा विकास, हाच एक ध्यास

datta jadhav

ग्रामीण भागात कंटेंटमेंट झोनबाबत नाराजी

Patil_p

भाजप नेत्याच्या तक्रारीवरून मेधा पाटकरांविरोधात ED ची कारवाई

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागात 283 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, तर 9 जणांचा मृत्यू

Archana Banage

सातारा : वीज बिल माफ होणार ! ‘ही अफवाच’

Archana Banage

महाराष्ट्र शासनाची नेम प्लेट लावून फिरणार्‍या तोतया क्लार्कला अटक

Archana Banage