Tarun Bharat

दोन हजाराची लाच स्वीकारताना हवालदारास रंगेहाथ पकडले

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

तक्रारदार यांच्याविरुद्ध कोर्टाचे जप्ती वॉरंटप्रमाणे कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱया सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विश्वास दत्तात्रय सपकाळ  (वय 51 वर्षे, रा. 13, शुक्रवार पेठ, सातारा) असे संबंधित पोलीस हवालदाराचे नाव आहे.

   याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 49 वर्षिय पुरुष तक्रारदारास त्याच्या विरुद्ध कोर्टाचे जप्ती वॉरंट जारी झाले होते. त्या वॉरंटप्रमाणे कारवाई न करण्यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्यात हवालदार पदावर नेमणूक असलेल्या विश्वास दत्तात्रय सपकाळ याने तक्रारदारास 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दि. 6 रोजी दाखल केली होती. सदर तक्रार अर्जाची पडताळणी करुन लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यामध्ये दि. 6 रोजी राजवाडा बस स्टॅंडजवळ लक्ष्मी रसवंती गृहासमोर 2 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना पोलीस हवालदार विश्वास सपकाळ यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. तसेच त्याचे विरुध्द शाहुपुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व श्रीमती सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस हवालदार संजय साळुखे, भरत शिंदे, विजय काटवटे, पोलीस नाईक संजय अडसुळ, प्रशांत ताटे, मारुती अडागळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, नीलेश येवले, नीलेश वायदंडे, शितल सपकाळ यांनी सहभाग घेतला.

Related Stories

कोल्हापूर -पुणे मार्गावर एसटीच्या फेऱ्या वाढल्या

Abhijeet Shinde

दारु बंदीसाठी सिताई फौंडेशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु

Patil_p

संभाजीराजेंचा सर्वांनी ठरवून गेम केलाय;भाजप आमदाराचा निशाणा कोणावर?

Abhijeet Shinde

सातारा : वाई आगारातील वाहकाचा कोरोनाने घेतला बळी

Abhijeet Shinde

सातारा : अकरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, अठरा जण विलगीकरण कक्षात दाखल

Abhijeet Shinde

जिल्ह्यात २४ तासात सरासरी १३.७४ मि.मी. पावसाची नोंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!