Tarun Bharat

दोष नव्हे दिशा देणारे सरकार निवडा!

पंतप्रधान मोदींचे प्रचारसभेत प्रतिपादन : सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेणाऱयांना धडा शिकवा : देशाला बळकट करणारे सरकार सत्तेवर आणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्वारका येथील प्रचारसभेत अरविंद केजरीवाल सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे. दिल्लीला दोष देणारे नव्हे तर दिशा देणारे सरकार हवे आहे. मतदानाच्या 4 दिवसांपूर्वी भाजपच्या बाजूने निर्माण झालेले वातावरण पाहून अनेकांची झोप उडाल्याचे मोदी म्हणाले. दहशतवादी हल्ल्यावेळी भारताच्या भूमिकेला कमकुवत करू पाहणारे राजकारण दिल्लीला नको असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी केजरीवालांना लक्ष्य केले आहे.

11 फेब्रुवारी रोजी काय घडणार हे पूर्व दिल्ली आणि द्वारका येथील चित्र पाहून स्पष्ट झाले आहे. दिल्लीची ही निवडणूक दशकातील पहिली निवडणूक आहे. हे दशक भारताचे राहणार असून देशाची प्रगती आज घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे. एकीकडे निर्णय घेणारे तर दुसरीकडे निर्णयांना विरोध करणारे उभे आहेत, असे मोदी म्हणाले.

दिल्लीला अडथळे आणणाऱया, द्वेष पसरविणाऱया राजकारणापासून मुक्ती हवी आहे. दिल्लीत केवळ स्वार्थ आणि द्वेषाचे राजकारण करण्यात आल्याचे जनतेने अनुभवले आहे. राजकारणाचे मूळ देशवासीय, दिल्लीवासीय आणि राष्ट्रहिताचे असेल तरच विकास शक्य आहे. विकासाचे काम रालोआ सरकार उत्तमप्रकारे करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  देशाला बळकट करणारे, सैनिकांसोबत उभे राहणारे सरकार दिल्लीत असावे. स्वतःच्या विधानांनी शत्रूला भारतावर वार करण्याची संधी देणारे राजकारण दिल्लीत नसावे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईनंतर दिल्ली सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानांबद्दल जनतेत संताप आहे. 8 रोजी हा संताप बाहेर पडून दिल्लीवासीय अशा लोकांना अद्दल घडवतील, असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायदा, कलम 370 सारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या सर्व मुद्दय़ांवर देशाला साथ देणारे नेतृत्व दिल्लीत असणे आवश्यक आहे. स्वतःच्या राजकारण, तुष्टीकरणासाठी लोकांना चिथावणी देणारे दिल्लीचे हित काय साधणार? बाटला हाउसच्या दहशतवाद्यांसाठी अश्रू ढाळणारे, त्यांना साथ देण्यासाठी सुरक्षा दलांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करू शकतात, पण दिल्लीचा विकास करू शकत नाहीत असा आरोप मोदींनी केला आहे.

मतपेढीमुळे दिल्लीचे नुकसान

मतपेढी, द्वेषाचे राजकारण, दुष्ट हेतू बाळगून दिल्लीचा विकास कधीच साध्य होणार नाही. दिल्लीचा विकास दररोज नवनव्या सबबी देऊन होऊ शकत नाही. विकासाकरता दृढ इच्छाशक्ती आणि संकल्पपूर्तीचा ध्यास असावा लागते. 1700 हून अधिक अवैध वस्त्यांमध्ये 40 लाख लोकांना घरांचा अधिकार केंद्र शासनानेच दिल्याचे मोदी
म्हणाले.

जागतिक स्तराची दिल्ली

दिल्लीत 21 व्या शतकाच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा, वाहतुकीची आधुनिक साधने, स्वच्छ हवा, पाणी उपलब्ध असावे हा भाजपचा संकल्प आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यापासून दिल्लीत विक्रमी कालावधीत महामार्ग तयार करण्यात आले आहेत. रॅपिड रेल्वे सिस्टीमसाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येथील जनतेला सुरक्षित आणि चांगले वातावरण मिळावे, असा प्रयत्न असल्याचे मोदींनी म्हटले
आहे.  

 

Related Stories

इतिहास लेखनात अनेकांवर अन्याय

Patil_p

सुनावणीसाठी हजर राहण्याचा सलमानला आदेश

Patil_p

औषधे, ऑक्सिजन, लसी पुरवठय़ावर भर द्या !

Patil_p

चुकीचा नकाशा दाखवणाऱ्या ट्विटरला केंद्र सरकारचा इशारा

Tousif Mujawar

भारत-अमेरिकेत उद्या ‘टू प्लस टू’ चर्चा

datta jadhav

‘रिपब्लिक’ला उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश

Patil_p