Tarun Bharat

द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताचे पहिले सराव सत्र संपन्न

भारत-न्यूझीलंड यांच्यात उद्या पहिली टी-20, उभय संघात 3 टी-20 नंतर 2 कसोटीही होणार

जयपूर / वृत्तसंस्था

नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय क्रिकेट संघाचे पहिले सराव सत्र सोमवारी संपन्न झाले. सवाई मानसिंग स्टेडियमवरील या शिबिरात नूतन कर्णधार रोहित शर्मासह भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला. भारत-न्यूझीलंड यांच्यात उद्या (बुधवार दि. 17) पहिली टी-20 खेळवली जाणार असून या मालिकेत 3 सामने होत आहेत. टी-20 मालिकेनंतर उभय संघात 2 कसोटी सामने देखील होणार आहेत.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्बरे, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड या त्रिकुटाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंचे सराव सत्र पार पडले. नंतर टी-20 कर्णधार रोहित शर्मा हा म्हाम्बरे व राठोड यांच्यासमवेत चर्चा करताना दिसून आला.

रविचंद्रन अश्विन, दीपक चहर, मोहम्मद सिराज, रिषभ पंत, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, इशान किशन, अक्षर पटेल यांनी या सराव सत्रात सहभाग घेतला. भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना दि. 17 रोजी जयपूरमध्ये, दुसरा सामना दि. 19 रोजी रांचीमध्ये तर तिसरा सामना दि. 21 रोजी कोलकात्यात खेळवला जाणार आहे. उभय संघातील 2 कसोटी सामने अनुक्रमे कानपूर (25 ते 29 नोव्हेंबर) व मुंबई (3 ते 7 डिसेंबर) येथे खेळवले जाणार आहेत.

सराव सत्राच्या प्रारंभी आयोजित व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत भारताचा टी-20 उपकर्णधार केएल राहुलने संघाचे मुख्य लक्ष्य पुढील वर्षात होणाऱया विश्वचषक स्पर्धेवर असेल, मात्र, त्यापूर्वी प्रत्येक मालिकेवर तितकीच मेहनत घेणार असल्याचे स्पष्ट केले.

न्यूझीलंड संघाचे दुबईतून आगमन

आयसीसी टी-20 विश्वचषक फायनल लढतीनंतर न्यूझीलंडचा संघ चार्टर फ्लाईटने सोमवारी जयपूरमध्ये दाखल झाला. दुबई ते जयपूर बायो-बबल ट्रान्स्फर असल्याने किवीज खेळाडूंना क्वारन्टाईन व्हावे लागणार नाही आणि ते उद्या होणाऱया पहिल्या टी-20 सामन्यात लगोलग खेळू शकतील. मंगळवारी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी होईल आणि त्यानंतर त्यांना सराव सत्र आयोजित करता येईल. टी-20 संघात समाविष्ट नसलेले रॉस टेलर व टॉम लॅथम यांच्यासह 9 कसोटीपटू मागील आठवडय़ातच भारतात दाखल झाले आहेत.

Related Stories

‘खेलो इंडिया’ विद्यापीठ क्रीडा स्पर्धा बेंगळुरात

Patil_p

टेटेपटू भाविनाबेन पटेलची अंतिम फेरीत धडक!

Patil_p

अमेरिकेच्या ऍलिसन फेलिक्सला विक्रमी 10 वे ऑलिम्पिक पदक

Patil_p

पुण्यात 4 डिसेंबरला ‘नाईट मॅरेथॉन’चा थरार

datta jadhav

धोनीचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे निधन

Patil_p

वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून इंडोनेशियाची माघार

Amit Kulkarni