Tarun Bharat

द्रविड संघाच्या कार्यासाठी युवा व महिला शक्तीला प्राधान्य

Advertisements

सुदिन ढवळीकर यांचे प्रतिपादन

वार्ताहर / मडकई

दविड ब्राम्हण संघाचे कार्य पूढे नेताना युवा व महीला शक्तींना प्राध्यान्य देऊन संघाचे सामर्थ्य वाढवण्याची आवश्यकता आहे. महीला व युवा शक्ती संघाला योग्य दिशा देऊ शकेल. तसेच संघाने संघटीत राहून ज्ञातिबांधवासाठी कार्य करताना अन्य समाजाकडेही वक्र दृष्टीने पाहू नये. मानवतेच्या धर्माचे पालन करणे हे आमचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.

फोंडा खडपाबांध येथील विश्व हिंदू परिषदेच्या सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या द्रविड ब्राम्हण संघ गोवा यांच्या सत्कार व बक्षिस वितरण्याच्या सोहळयात आमदार सुदिन ढवळीकर प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी द्रविड ब्राम्हण संघ गोवाच अध्यक्ष दिलीप माधवराव ढवळीकर, उपाध्यक्ष अनंत काजरेकर, सागर भट आदी व्यासपिठावर उपस्थीत होते. ज्ञातिबांधवातील अकाली वैधव्य आलेल्या बहीणींना संघाने आर्थीक आधार देणे आवश्यक आहे. राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून संपूर्ण गोवा पालथा घालावा लागतो. त्यावेळी अनेक गावातील वैधव्य आलेल्या बहीणींची व्यथा पाहून आपले मन द्रवले. कर्तव्य भावनेतून आपण मदत केलेली आहे. मात्र द्रविड ब्राम्हण संघाने याकामी पूढाकार घेण आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात काम करताना सरकारच्या असलेल्या अनेक योजनाचा ही लाभ घेण्याचे आवहन आमदार श्री ढवळीकर यांनी पूढे बोलताना केले.

द्रविड ब्राम्हण संघाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष दिलीप ढवळीकर म्हणाले, नव्या जुन्याची सांगड घालून संघाचे कार्य सर्वांच्याच सहकार्याने पूढे नेणे गरजचे आहे.   विविधतेने नटलेल्या देशात अनेक जाती धर्म पंथ आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या समाजाप्रति जागृतेने, कर्तव्य व समर्पित भावनेने योगदान देताना मानवतेच्या दृष्टीकोनातून आपली इतरही कर्तव्ये जाणून घेतली पाहीजे. तरच प्रत्येक माणसाचा समाज व संघ बलीष्ठ होईल.

संघासाठी दामोदर उपाध्ये, गो. रा. ढवळीकर, पांडूरंग सावईकर, केशव माधव बखले, विजया नवाथे, रेखा उपाध्ये, मधूकर देसाई व दत्तात्रय अभिषेकी यांनी  दिर्घ कालावधी पर्यंत योगदान देल्याबद्दल या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार माजी मंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचीन्ह देऊन  करण्यात आला.

सत्कारमुर्ती गो. रा. ढवळीकर म्हणाले, ब्राम्हण हा सर्व हिंदू धर्मीयाचा मार्गदर्शक आहे. पुजा पाठ, आरत्या, मंगलाष्टके, स्तोत्रे, मंत्र या सर्वाचा संग्रह करून एक पुस्तीका प्रकाशीत केल्यास त्यांचा सर्वांनाच फायदा होईल. त्याचबरोबर ब्राम्हणांनी त्यांचे प्रजाजन वाढविल्यास त्यांची लोकसंख्या ही वाढीस जाईल.

 सर्व तालुक्यातील संघातील महीलांसाठी घेतलेल्या पालकला व निबंध लेखन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना आमदार श्री ढवळीकर यांच्या हस्ते पारितोषीके वितरीत करण्यात आली. यावेळी विजया नवाथे व शुभदा सावईकर यांनी विचार व्यक्त केले.

 स्वागत प्रास्ताविकात अनंत काजरेकर म्हणाले, मतभेद मिटवीता येतात. पण मनभेद मिटवीता येत नाही. म्हणून सर्वांनी एक विचाराने व एक दिलाने कार्य करून संघ मोठा करण्याची आवश्यकता आहे. कर्जावू  शिष्यवृत्ती देऊन संघातील होतकरू विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याच्या प्रयत्नाला उद्योजकांनी देणगी स्वरूपातून हातभार लावाला. s दिवंगत अध्यक्ष प्रा व सिए मोहन ढवळीकर यांच्या मूळे हे अध्यक्षपद रिक्त होते. त्यांच्या जागी त्यांचे बंधू दिलीप ढवळीकर यांची एकमुखाने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुत्रसंचालन दिपा मिरींगकर यांनी केले. बक्षिसांची यादी माला प्रभू यांनी सादर केली तर आभार शाभदा सावईकर यांनी केले

Related Stories

समिल वळवईकर यांच्याकडून दिवाडी बेटावर ऍम्ब्यलन्स सेवा

Amit Kulkarni

काणकोणातील भाजप उमेदवारी आपल्यालाच मिळणार

Amit Kulkarni

राज्य प्लास्टिकमुक्त करण्याच्यादृष्टीने आदर्श उपक्रम

Patil_p

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या खोटेपणाचा पर्दाफाश

Amit Kulkarni

युवकाला दंडुक्याने मारहाण करणाऱया पोलिसांचे निलंबन

Omkar B

डॉ.विशाल च्यारी यांना अर्थशास्त्रातील कार्यासाठी पुरस्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!