Tarun Bharat

द्राक्षबिया आणि दंतरोग्य

निसर्गात उपलब्ध असणार्या अनेक फळांच्या बियाही आरोग्यासाठी गुणकारी असतात. पपईच्या बिया, भोपळ्याच्या बिया, जांभूळाच्या बिया यांचे आरोग्यलाभ अनेकांना माहीत आहेत.

  • आता एका संशोधनातून द्राक्षांच्या बियांचे दातांसाठीचे फायदे समोर आले आहेत. त्यानुसार या बिया दात किडण्यापासून संरक्षण देऊ शकतात.
  • या बियांमध्ये एक असा घटक असतो जो दातांना सुरक्षित ठेवणार्या उतींना मजबुती देतो. या उती दातांवरील चमक कायम ठेवणार्या स्तरात असतात. त्यांना डेंटिन असे म्हटले जाते. त्या सुस्थितीत असल्या की दात किडत नाहीत.
  • शिकागोमधील इलिनोईस युनिव्हर्सिटीच्या बेड्रेन-रूसो यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले, डेंटिन हे प्रामुख्याने कोलेजनपासून बनलेले असते. कोलेजन हे त्वचा आणि अन्य संयोगी उतींच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे एक मुख्य प्रोटिन आहे.
  • रेजिन हे डेंटिनला घट्ट ठेवतात. मात्र दोन रेजिनमधील अंतर हे एक कमजोर जागा असते व त्यामुळे दात किडू लागतात. हे रोखण्यासाठी आवश्यक असणारा घटक द्राक्षांच्या बियांमध्ये नैसर्गिकरीत्याच असतो.
  • हा घटक आणि भाज्यांमध्ये आढळणारे फ्लेवोनाईड यांच्या मिश्रणातून कोलेजनमधील क्षती दुरुस्त केली जाऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Related Stories

फायदे चक्रासनाचे

tarunbharat

लांबसडक केसांसाठी घरच्या घरी बनवा, आयुर्वेदिक तेल

Kalyani Amanagi

भरभर खाल्ल्यास भरभर वाढते वजन

Patil_p

हायपर डायड्रेसिस म्हणजे काय

Amit Kulkarni

भारतीयांच्या आयुष्यात कोरोनामुळे दोन वर्षांनी घट

Archana Banage

भ्रूणाच्या नाळेत ‘मायक्रोप्लास्टिक’

Omkar B