Tarun Bharat

द्रोणाचार्यसाठी ज्युड फेलिक्स यांना व्ही.भास्करन यांचा पाठिंबा

वृत्तसंस्था/ बेंगळूर

द्रोणाचार्य पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकाला जाणारा भारताचा सर्वोच्च  पुरस्कार असून यावेळी हॉकीमधील तीन माजी खेळाडू ज्युड फेलिक्स, बीजे करिअप्पा, रोमेश पठानिया या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहेत.

फेलिक्स या तिघांमधील सर्वात परिपूर्ण व्यक्ती असली तरी हॉकी इंडियाने आजवर त्यांच्याकडे दुर्लक्षच केले आहे. मात्र माजी कर्णधार व माजी प्रशिक्षक व्ही. भास्करन यांनी फेलिक्स यांचे समर्थन करीत या पुरस्कारासाठी त्यांना पाठिंबा दिला आहे. फेलिक्स व करिअप्पा यांची कामगिरी जवळपास सारखीच झाली आहे. 2017 ते 19 या कालावधीत फेलिक्स कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक असताना करिअप्पा त्यांचे साहायक होते. करिअप्पा व पठानिया यांची राष्ट्रीय फेडरेशनने शिफारस केली आहे तर बुधवारी स्व-नामांकन करण्याची सुविधा क्रीडा मंत्रालयाने उपलब्ध करून दिल्यानंतर मित्रांच्या आग्रहाखातर फेलिक्स यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. भास्करन यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांनी हा अर्ज केंद्राकडे पाठविला आहे.

Related Stories

भारत अ संघाचा निसटता पराभव

Patil_p

युक्रेन संघाचे बीजिंगमध्ये जोरदार स्वागत

Patil_p

माझ्यात फारसे क्रिकेट राहिलेले नाही!

Omkar B

न्यूझीलंड दौऱयासाठी राहुल द्रविडला विश्रांती

Patil_p

आयसीसीच्या मासिक सर्वोत्तम पुरस्कारासाठी बुमराहची शिफारस

Patil_p

अंकित बावणेच्या द्विशतकासह महाराष्ट्राचा धावांचा डोंगर

Patil_p