Tarun Bharat

द. आफ्रिका दौऱयाची हमी दिलेली नाही : बीसीसीआय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱयाबाबत आम्ही कोणत्याही प्रकारची हमी दिलेली नाही. सध्या फक्त शक्यतेवर चर्चा झाली आहे, असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे खजिनदार अरुण धुमल यांनी दिले. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक ग्रॅहम स्मिथ व मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी जॅक्वेस फॉल यांनी भारताने ऑगस्टमध्ये आफ्रिका दौरा करण्यास संमती दर्शवली असल्याचा दावा यापूर्वी केला होता. त्या पार्श्वभूमीवर धुमल यांनी मंडळाची भूमिका स्पष्ट केली.

‘दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे रद्द करावा लागला, त्यावेळी फक्त चर्चा झाली होती व दौरा केव्हा घेतला जाऊ शकतो, याबद्दलच्या शक्यतेवर त्यात भर होता. पण, आम्ही ऑगस्टमध्येच दौऱयावर येऊ, असे अभिवचन क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला अजिबात दिलेले नाही’, असे धुमल पुढे म्हणाले.

जोवर केंद्र प्रशासन एखाद्या आंतरराष्ट्रीय दौऱयाला परवानगी देत नाही, तोवर आम्ही कोणत्याही देशाला असे अभिवचन देऊ शकत नाही. सध्या जुलैमध्ये लंका दौरा व त्यानंतर झिम्बाब्वेतील छोटेखानी टी-20 मालिका हे फ्यूचर टूर प्रोग्रॅममध्ये आहे आणि आम्ही त्यावर लक्ष केंद्रित करुन आहोत, असे त्यांनी येथे स्पष्ट केले.

Related Stories

पदार्पणवीर रॉबिन्सन अवघ्या 5 दिवसात निलंबित!

Patil_p

चेन्नईचा जाता जाता पंजाबलाही धक्का!

Patil_p

रेऑनिकची ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार

Patil_p

माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू अभय दाढे यांचे निधन

Patil_p

पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

बंगाल, मुंबईसह 7 संघ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p