Tarun Bharat

द.आफ्रिकेच्या वनडे कर्णधारपदी क्विटॉन डी कॉक

इंग्लंडविरुद्ध होणार वनडे मालिका, डु प्लेसिसला डच्चू

वृत्तसंस्था/ केपटाऊन

यष्टिरक्षक फलंदाज क्विन्टॉन डी कॉकची दक्षिण आफ्रिकेने वनडे संघाचा कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. विद्यमान कर्णधार फॅफ डु प्लेसिसची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून इंग्लंडविरुद्ध होणाऱया तीन मालिकेतूनही त्याला डच्चू देण्यात आला आहे.

डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाने मागील वर्षीच्या वनडे विश्वचषक स्पर्धेत पूर्णतः निष्प्रभ कामगिरी केली होती. यावर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून या स्पर्धेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे त्याने संकेत दिले आहेत. ‘डी कॉकचा दर्जा आपण सर्वचजण जाणतो. गेल्या अनेक वर्षापासून त्याचा आत्मविश्वास वाढत असल्याचे आम्ही पाहिले आहे. तो वनडेतील अव्वल यष्टिरक्षकांपैकी एक असून तो आपले काम चोख बजावतो. याशिवाय डावपेच आखण्यातही तो हुशार आहे,’ असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे क्रिकेट संचालक ग्रीम स्मिथ यांनी सांगितले.

15 सदस्यीय संघात पाच नवोदित खेळाडू असून वेगवान गोलंदाज लुथो सिपाम्ला, सिसांदा मगाला, फिरकी अष्टपैलू बियॉन फोर्टुइन, सलामीचा फलंदाज जानेमन मलान, यष्टिरक्षक फलंदाज काईल व्हेरीन्ने यांचा समावेश त्यात समावेश आहे. मगाला, तबरेझ शम्सी, लुंगी एन्गिडी, जॉन जॉन स्मुट्स यांना मात्र फिटनेस चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. रबाडाला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. 4 फेब्रुवारीला पहिला वनडे सामना होणार असून 7 रोजी दरबानमध्ये दुसरा व 9 फेब्रुवारी रोजी शेवटचा सामना जोहान्सबर्गमध्ये होणार आहे.

द.आफ्रिका वनडे संघ : क्विन्टॉन डी कॉक (कर्णधार), रीझा हेन्ड्रिक्स, टेम्बा बवुमा, रासी व्हान डर डुसेन, डेव्हिड मिलर, जॉन जॉन स्मुट्स, अँडिले फेहलुक्वायो, लुथो सिपाम्ला, एन्गिडी, शम्सी, सिसांद मगाला, फोर्टुइन, ब्युरॉन हेन्ड्रिक्स, जानेमन मलान, काईल व्हेरिन्ने.

Related Stories

सोमवारपासून द.कोरियामध्ये फुटबॉल हंगामाला प्रारंभ

Patil_p

जपानची ओसाका उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

‘त्या’ रोमांचक लढतीत स्टोक्सने घेतला होता ‘सिगारेट ब्रेक’!

Patil_p

लिसेस्टरकडून मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का

Patil_p

फुटबॉलचे शहेनशहा…पेले !

Patil_p

चेन्नई सुपरकिंग्स संघात अनुभवी अम्बाती रायुडूचे पुनरागमन

Patil_p